खरीप 2025 चा पीक विमा मिळणार की नाही? ‘ई-पीक पाहणी’ झाली का? ‘आपली चावडी’ पोर्टलवर लगेच तपासा Kharif 2025 crop insurance status

Kharif 2025 crop insurance status: खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठी आणि खरीप 2025 चा पीक विमा मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी (e-Pik Pahani) केलेली असेल, त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपली ई-पीक पाहणी झाली आहे की नाही, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आता आपण घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने कशी तपासायची, याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

ऑनलाईन स्थिती तपासण्याची प्रक्रिया

तुमची ई-पीक पाहणी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘आपली चावडी’ या पोर्टलचा वापर करावा लागतो. यासाठी खालील टप्पे वापरावे:

1. ब्राउझरवर सर्च करा: गुगल किंवा क्रोम ब्राउझरवर जाऊन ‘आपली चावडी’ असे सर्च करा. सर्च केल्यानंतर ‘महाभूमी’ (Mahabhumi) नावाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. (https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi)

2. ‘पीक पाहणी’ ऑप्शन निवडा: भूमी महाभूमीच्या डॅशबोर्डवर दिसणाऱ्या ‘पीक पाहणी’ या नवीन ॲप पर्यायावर क्लिक करा.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

3. माहिती भरा: यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

4. खाता क्रमांक टाका: तुमच्या ८-अ (8-A) च्या उताऱ्यावर असलेला खाता क्रमांक या ठिकाणी अचूक टाका.

5. हंगाम निवडा: हंगाम म्हणून ‘खरीप’ आणि वर्ष ‘2025-26’ निवडा.

6. माहिती तपासा: कॅप्चा कोड टाकून ‘आपली चावडी पहा’ यावर क्लिक करा.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

निकाल आणि मुदतवाढ

वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर जर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा खाता क्रमांक, गट नंबर, शेतकऱ्याचे नाव, पिकाचा प्रकार, पिकाचे नाव (उदा. सोयाबीन), आणि क्षेत्राची संपूर्ण माहिती दिसली, तर याचा अर्थ तुमची ई-पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

जर या ठिकाणी कोणतीही माहिती दिसली नाही, तर तुमची ई-पीक पाहणी अजून झालेली नाही, असे समजावे. तरीही, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, ज्यांची ई-पीक पाहणी झाली नसेल, त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक स्तरावर (कृषी सहाय्यक यांच्या मदतीने) ई-पीक पाहणी करण्याची अजूनही संधी उपलब्ध आहे. या वेळेत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करून शेतकरी खरीप 2025 च्या पीक विम्याचा लाभ आपल्या खात्यावर वर्ग करून घेऊ शकतात.

➡️ ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment