भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहतील? जाणून घ्या संपूर्ण यादी!

“India Pakistan war support country” हा प्रश्न पुन्हा चर्चेत असल्याचं पहायला मिळतयंत. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावलं उचलली, तर कोणकोणते देश भारताच्या समर्थनार्थ उभे राहतील? 1999 च्या कारगिल युद्धाच्या तुलनेत आता भारताचं जागतिक स्थान अधिक मजबूत आहे, आणि त्यामुळे साथ देणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे.

अमेरिका – भारताचा सर्वात मोठा रणनीतिक मित्र

अमेरिका आणि भारत यांचं संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानातील भागीदारी गेल्या काही वर्षांत अधिक दृढ झाली आहे. QUAD, I2U2 यांसारख्या आंतरराष्ट्रीय गटांमध्ये दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. त्यामुळे भारताने कारवाई केल्यास, अशावेळी अमेरिका कडून ठाम राजनैतिक पाठिंबा अपेक्षित आहे.

रशिया, फ्रान्स आणि इस्रायल – परंपरागत मित्र

रशिया भारताचा जुना संरक्षण भागीदार आहे, तर फ्रान्स आणि इस्रायलनेही भारताला युद्धसामग्री व टेक्नोलॉजी पुरवली आहे. हे तिन्ही देश भारताच्या बाजूनेच उभे राहणार हे निश्चित आहे.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

ब्रिटन आणि चीन – विरोधाची शक्यता कमी

ब्रिटन सध्या भारतासोबत व्यापार वाटाघाटी करत आहे. तर चीनही भारताला उघड विरोध करण्याच्या स्थितीत नाही. दोघेही तटस्थ राहतील, परंतु भारताविरोधात जाण्याची शक्यता कमी.

भारताचं जागतिक वजन – आता अधिक मजबूत

1999 च्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था, संरक्षण क्षमता आणि आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत झाले आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही कारवाई केल्यास, भारत पूर्णपणे एकटा राहणार नाही, तर त्याच्या सोबत उभे राहणारे देश अधिक प्रबळ असतील.

India Pakistan war support country या मुद्द्यावर विचार केला असता, स्पष्टपणे दिसून येतं की आज भारताच्या बाजूने अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल यांसारखे महाशक्ती असलेले देश उभे आहेत. ब्रिटन आणि चीन सुद्धा विरोधामध्ये जाण्याची संभाव्यता कमी आहे. हे सगळं भारताच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाचं फळ आहे.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment