HSRP नंबर प्लेट अनिवार्य, जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि खर्च High Security Number Plate

HSRP Number Plate Online Registration : सरकारने चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. हे जर नाही केले तर 5000 रुपयांचा दंड वाहन मालकाला भरावा लागू शकतो. HSRP ही ॲल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ब्ल्यू क्रोमियम आधारित अशोक चक्र होलो ग्राम आहे. वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशन नंतर ही जारी केली जाते.

सरकारने 31 मार्चच्या आत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत दिली आहे. HSRP नंबर प्लेट बसण्याचा नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी 1 एप्रिल 2019 च्या आधी त्यांचे वाहन रजिस्ट्रेशन केले आहे. राज्यनिहाय या नंबर प्लेटसाठी बसविण्यात येणाऱ्या खर्चाची रक्कम वेगवेगळी आहे. HSRP नंबर प्लेट बनवण्यासाठी खर्च किती येतो? या नंबर प्लेटची नोंदणी कशी करायची? या नंबर प्लेटचे फायदे कोणते आहेत? याची सविस्तर माहिती येथे जाणून घेऊ.

HSRP नंबर प्लेटसाठी किती खर्च येतो?

दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व जड वाहनाच्या प्रकारानुसार हि नंबर प्लेट बनवण्यासाठी राज्यानुसार खर्च वेगवेगळा आहे. High Security Number Plate (HSRP) नंबर प्लेट बनवण्यासाठी 500 ते 1000 रूपयांपर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो.

HSRP नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे? HSRP Number Plate Online Registration

● अधिकृत परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या

● यासाठी Bookmyhsrp.com पोर्टल वर जा

● तुमच्या वाहनावर आधारित प्लेटचा प्रकार सिलेक्ट करा

● त्यानंतर नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक, चासी क्रमांक तसेच वाहन मालक आणि वाहना बद्दलची माहिती भरा (पत्ता, संपर्क माहिती)

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

● आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करा

● त्यानंतर विहित शुल्क ऑनलाईन भरा

● नंतर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा

● तुमचे वाहन आणि आवश्यक कागदपत्रे यासह नियोजित तारखेला फिटमेंट सेंटरला भेट द्या किंवा तुम्हाला घरी येऊन HSRP बसवण्याचीही सुविधा मिळू शकते.

● वाहन पोर्टल वरील माहितीशी तुमच्या वाहन आणि मोबाईल क्रमांकाचा तपशील जुळला पाहिजे.

● HSRP ची किंमत वाहनाच्या प्रकारानुसार बदलते याची माहिती तुम्हाला असायला हवी

HSRP नंबर प्लेटचे फायदे काय आहेत?

● HSRP नंबर प्लेट मध्ये कोणालाही बदल करता येत नाही त्या पद्धतीनेच त्या बनवलेल्या असतात. ही नंबर प्लेट बनावट बनवणे कठीण आहे त्यामुळे वाहन चोरी होण्याची शक्यता कमी असते.

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

● चोरीची वाहने तसेच बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यासाठी HSRP नंबर प्लेट्स मदत करतात, त्यामुळे फसवणूक होत नाही.

● एखादं वाहन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल किंवा अपघाताला कारणीभूत ठरले असेल तर HSRP नंबर प्लेटमुळे आपल्याला ते ओळखण्यात मदत होते.

● HSRP नंबर प्लेट ही नटबोल्टला फिटिंग करता येत नाही, तशी परवानगी देखील नाही त्यामुळे ही नंबर प्लेट घरी बसवता येत नाही.

● HSRP नंबर प्लेट वाहनाला बसवताना पुन्हा न वापरता येणारा रॅबिट लॉक वापरला जातो त्यामुळे ही नंबर प्लेट सहसा काढता येत नाही. ती तेव्हाच काढली जाऊ शकते जेव्हा तिचे लॉक तोडले जाते.

● रिफ्लेक्टिव्ह शीटिंग मुळे HSRP नंबर प्लेट अंधारात देखील चमकते.

Leave a Comment