How to Repay Loan Fast: कर्ज लवकर कसे फेडायचे? पहा 7 प्रॅक्टिकल ट्रिक्स

आजच्या काळात कर्ज घेणे सामान्य झाले असले तरी ते लवकर फेडणे हे खूप महत्त्वाचे असते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले. व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या आणि हप्ते भरताना अडचन होऊ लागली. पण आता परिस्थिती पूर्ववत होत आहे. या लेखात आपण “How to repay loan fast” या विषयावर उपयुक्त, प्रभावी आणि प्रॅक्टिकल उपाय पाहणार आहोत.

कर्जाचे प्रकार समजून घ्या (Types of Loans)

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लोन उपलब्ध आहेत:

• होम लोन (Home Loan)
• पर्सनल लोन (Personal Loan)
• क्रेडिट कार्ड लोन
• कंज्युमर लोन (Consumer Loan)
• कार लोन

प्रत्येक लोनचा व्याजदर वेगळा असतो. म्हणूनच कर्ज फेडण्याची रणनीती ठरवताना हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

How to Repay Loan Fast – कर्ज लवकर फेडण्याचे सोपे उपाय

सर्वात जास्त व्याज असलेले कर्ज आधी फेडा

सर्वप्रथम ज्या कर्जावर सर्वाधिक व्याजदर (Interest Rate) आहे, ते फेडा. उदा. क्रेडिट कार्ड लोन हे सहसा 30%-40% पर्यंत व्याज घेतात. अशा कर्जांचा भार कमी केल्यास दरमहिन्याच्या खर्चावर त्वरित परिणाम होतो.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

युक्ती:

एक Loan Repayment Calculator वापरून प्रत्येक कर्जावर किती व्याज जात आहे हे तपासा आणि जास्त इंटरेस्ट असलेले लोन टार्गेट करा.

सहज फेडता येणारे लोन लवकर संपवा

लहान लोन जसे की 10,000-50,000 रुपयांचे पर्सनल लोन किंवा कंज्युमर लोन लवकर फेडले तर आत्मविश्वास वाढतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि उरलेल्या कर्जांवर लक्ष केंद्रित करता येते.

होम लोन ट्रान्सफर किंवा रीस्ट्रक्चर करा

होम लोन ट्रान्सफर ही एक स्मार्ट चाल आहे. जर सध्याच्या बँकेचा व्याजदर जास्त असेल, तर तो कमी दर असलेल्या बँकेत ट्रान्सफर करा.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

फायदे:

• व्याज कमी झाल्याने EMI कमी होतो
• लाखो रुपये वाचू शकतात
• Flexibility वाढते

टीप: Floating Interest Rate असलेल्या होम लोनवर बँका नव्या ग्राहकांना कमी दर देतात, मात्र जुने ग्राहक दुर्लक्षित होतात. अशावेळी, व्याजदर कमी करण्याची विनंती करा किंवा दुसऱ्या बँकेचा पर्याय निवडा.

बोनस टिप्स: कर्ज लवकर फेडण्यासाठी

• EMI पेक्षा जास्त रक्कम भरण्याचा प्रयत्न करा – वर्षातून दोनदा तरी अतिरिक्त पेमेंट करा.
• Side Income वाढवा – Freelancing, Weekend Jobs, किंवा Small Business सुरु करा.
• बजेट तयार करा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा – अनावश्यक खर्च टाळा.
• अग्रेसिव्ह EMI प्लॅन निवडा – उत्पन्नाच्या 40% पर्यंत EMI ठेवण्याचा विचार करा.

योग्य नियोजन, योग्य प्राधान्य आणि स्मार्ट निर्णय यामुळे आपण कर्जमुक्त होऊ शकतो. आजपासून सुरुवात करा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना!

Leave a Comment