गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

आरती संग्रह अनुक्रमणिका

  • ​१. श्री गणपतीची आरती (सुखकर्ता दुःखहर्ता)
  • २. श्री शंकराची आरती (लवथवती विक्राळा)
  • ३. श्री देवीची आरती (दुर्गे दुर्घट भारी)
  • ४. श्री दत्त आरती (त्रिगुणात्मक त्रैमूर्ती)
  • ५. श्री विठ्ठलाची आरती (युगें अठ्ठावीस)
  • ६. श्री विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठले)
  • ७. श्री ज्ञानदेवाची आरती (आरती ज्ञानराजा)
  • ८. श्री मारुतीची आरती (सत्राणें उड्डाणें)
  • ९. नमन श्लोक (सदा सर्वदा योग तूझा घडावा)
  • १०. प्रार्थना (घालीन लोटांगण वंदीन चरण)

श्री गणपतीची आरती (सुखकर्ता दुःखहर्ता)

​सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

​जय देव जय देव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ०॥

​रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरेजडित मुगुट शोभतो बरा

रूणझुणती नूपुरें चरणी घागरिया ॥२॥

​लंबोदर पीतांबर फणिवरबंधना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥

श्री शंकराची आरती (लवथवती विक्राळा)

​लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा

विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाला

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥१॥

​जय देव जय देव जय श्रीशंकरा

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥धृ०॥

​कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा

विभूतीचें उधळण शितिकंठ नीळा

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

​देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें

त्यामाजीं अवचित हाळाहळ उठिलें

तें त्वां असुरपणें प्राशन केलें

नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥

​व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥४॥

श्री देवीची आरती (दुर्गे दुर्घट भारी)

​दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं

अनाथनाथे अंबे करूणा विस्तारीं

वारीं वारीं जन्ममरणांतें वारीं

हारीं पडलों आतां संकट नीवारीं ॥१॥

​जय देवी जय देवी महिषासुरमथनी

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥

​त्रिभुवनभुवनीं पहातां तुजऐसी नाहीं

चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं

साही विवाद करितां पडले प्रवाहीं

ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही ॥२॥

​प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा

क्लेशापासुनि सोडीं तोडीं भवपाशा

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा

नरहरि तल्लीन झाला पदपंकज लेषा ॥३॥

श्री दत्त आरती (त्रिगुणात्मक त्रैमूर्ती)

​त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा

नेति नेति शब्द न ये अनुमाना

Farmer ID login e-Pik Pahani
खुशखबर! शेतकरी ई पीक पाहणी सुरू Farmer ID login e-Pik Pahani

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

​सबाह्य अभ्यांतरी तू एक दत्त

अभाग्यासी कैसी न कळे ही मात

पराही परतली तेथे कैचा हा हेत

जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥

​दत्त येऊनिया उभा ठाकला

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला

जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥

​दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

हरपले मन झाले उन्मन

मी तू पणाची झाली बोळवण

एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥

श्री विठ्ठलाची आरती (युगें अठ्ठावीस)

​युगें अठ्ठावीस विटेवरी उभा

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा

चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

​जय देव जय देव जय पांडुरंगा

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥धृ॥

​तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं

कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटीं

देव सुरवर नित्य येती भेटी

गरूड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥

​धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा

सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळा ॥३॥

​राही रखुमाबाई राणीया सकळा

ओवाळिती राजा विठोबा सांवळा ॥४॥

​ओवाळूं आरत्या कुरवंड्या येती

चंद्रभागेमाजी सोडुनियां देती

डिंड्या पताका वैष्णव नाचती

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥५॥

​आषाढी कार्तिकी भक्तजन येती

चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती

दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती

केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥६॥

श्री विठ्ठलाची आरती (येई हो विठ्ठले)

येई हो विठ्ठले माझे माउली ये

निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥धृ॥

आलिया गेलिया हातीं धाडीं निरोप

पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥

पिवळा पीतांबर कसा गगनीं झळकला

गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥२॥

विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिपवाळी

विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळीं ॥३॥

श्री ज्ञानदेवाची आरती (आरती ज्ञानराजा)

​आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा

सेविती साधुसंत मनु वेधला माझा ॥धृ॥

​लोपलें ज्ञान जगीं हित नेणती कोणी

अवतार पांडुरंग नाम ठेविलें ज्ञानी ॥१॥

​कनकाचें ताट करीं उभ्या गोपिका नारी

नारद तुंबरही साम गायन करी ॥२॥

​प्रकट गुहा बोले विश्व ब्रह्मचि केलें

ST Bus NCMC Card Recharge Online
NCMC कार्ड अगदी 2 मिनिटात करा घरबसल्या रिचार्ज ST Bus NCMC Card Recharge Online

रामा जनार्दनीं पायीं मस्तक ठेविले ॥३॥

श्री मारुतीची आरती (सत्राणें उड्डाणें)

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं

गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं

सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥

जय देव जय देव जय हनुमंता

तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥धृ०॥

दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द

थरथरला धरणीधर मानीला खेद

कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद

रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥जय देव० ॥२॥

नमन श्लोक (सदा सर्वदा योग तूझा घडावा)

​सदा सर्वदा योग तूझा घडावा

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको गूणवंता अनंता

रघूनायका मागणे हेचि आतां ॥

​कैलास राणा शिव चंद्रमौळी

फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥

कारुण्य सिंधू भवदुःखहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

​मोरया मोरया मी बाळ तान्हेँ

तुझीच सेवा करू काय जाणे ॥

अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वरा ब तू घाल पोटी ॥

​ज्या ज्या ठिकाणीं मन जाय माझे

त्या त्या ठिकाणीं निजरुप तुझे ॥

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणीं

तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

​अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र

तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र ॥

तया आठविता महापुण्यराशी

नमस्कार माझा सदगुरु ग्यानेश्वराशी ॥

प्रार्थना (घालीन लोटांगण वंदीन चरण)

​घालीन लोटांगण वंदीन चरण

डोळ्यानि पाहीन रुप तुझे

प्रेमें आलिंगन आनंदें पूजिन

भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥

​त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्व मम देव देव ॥२॥

​कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा

बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्

करोमि यद्यत् सकलं परस्मै

नारायणायेति समर्पयामि ॥३॥

​अच्युतं केशवं रामनारायणं

कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं

जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

​हरे राम हरे राम राम राम हरे हरे

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

Leave a Comment