Fertilizer Price Hike: रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ; शेतकऱ्यांपुढे नवीन संकट

Fertilizer Price Hike: शेतकरी वर्ग आधीच अतिवृष्टी, बाजारभावातील अनिश्चितता, आणि उत्पादन खर्चातील वाढ अशा अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यात आता रासायनिक खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडवले आहे. ऐन रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावरच खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे.

खतांच्या दरात मोठी वाढ

अलीकडे विविध मिश्र रासायनिक खतांच्या दरात प्रति बॅग 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गहू, हरभरा, कांदा, सोयाबीन, आणि भाजीपाला यांसारख्या पिकांसाठी ही दरवाढ मोठा धक्का आहे. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या युरिया, डीएपी आणि एनपीके खतांचे भाव वाढल्याने शेतीचा एकूण उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे.

युरिया खताचे दर सरकारी निर्देशांनुसार ₹266 प्रति बॅग ठेवले गेले आहेत, परंतु वाहतूक भाडे न मिळाल्याने अनेक कृषी विक्रेते 10 ते 20 रुपये अधिक दराने विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी करताना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

लिंकिंग प्रॉडक्टची जबरदस्ती

काही कंपन्या खतांसोबत वॉटर सोल्यूबल खते, मायक्रोन्युट्रिएंट्स, मायक्रोरायझा आदी उत्पादनांचे “लिंकिंग” करून विक्री करत आहेत. या प्रॉडक्ट्सचा उठाव कमी असल्याने विक्रेत्यांकडून तो माल शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक ताण येतो.

बाजारभाव स्थिर, उत्पादन खर्च वाढता

एकीकडे खतांचे दर झपाट्याने वाढत आहेत, पण शेतीमालाचे भाव मात्र स्थिर आहेत. कांदा, कापूस, सोयाबीन, आणि भाजीपाला या पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित नफा राहत नाही. उत्पादन खर्चात खतांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे खतांच्या भाववाढीने शेती आणखी तोट्याची ठरते आहे.

सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह

शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, केंद्र सरकारच्या चुकीच्या शेती धोरणांमुळेच खतांचे दर वाढले आहेत. 2024 नंतर खतांच्या दरात मोठी वाढ झाली असून, आता पुन्हा झालेली ही वाढ शेतकऱ्यांना तोट्यात आणणार आहे. केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून खतांचे दर कमी करावेत आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा आणि योग्य खत व्यवस्थापनाचा प्रशिक्षण द्यावा, अशी मागणी होत आहे.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

Fertilizer Price Hike

रासायनिक खतांच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डळमळीत झाली आहे. शेती लाभदायक राहण्यासाठी सरकारने खतांचे दर नियंत्रणात ठेवणे, शेतमालाला हमीभाव देणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा खतांच्या दरवाढीचे ओझे शेवटी शेतकऱ्यांच्या खांद्यावरच पडणार आहे.

रासायनिक खतांचे प्रकार आणि वाढलेले नवे दर

रासायनिक खतेजुने दरनवे दर
10:26:2610,72511,925
25:25:2514,55016,500
20:20:0:1312,30013,400
16:16:1614,67516,600
24:24:0012,64014,800
08:12:1212,60013,840
12:32:1612,64013,800
म्युरेट ऑफ पोटॅश14,52515,600
14:35:1412,60013,600
23:23:0012,64013,640

➡️ ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment