एसटी बस प्रवाशांसाठी मोठी बातमी: ‘या’ तारखेपूर्वी काढा NCMC स्मार्ट कार्ड, अन्यथा सवलत होणार बंद! MSRTC NCMC Smart Card

MSRTC NCMC Smart Card: जर तुम्ही एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST Mahamandal) आता प्रवासी सवलतींसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. यासाठी महामंडळाने अधिकृत परिपत्रक जारी करून अंतिम तारीख देखील जाहीर केली आहे.

​महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्ड मुदतीपूर्वी काढून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे कार्ड काढले नाही, तर तुम्हाला एसटी प्रवासातील सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट (Full Ticket) काढावे लागू शकते.

​1 ऑगस्ट 2026 पासून नियम लागू; काय आहे परिपत्रकात?

​एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये आर्थिक पारदर्शकता आणणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि तिकीट प्रक्रिया सुलभ करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ पासून खालील प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) म्हणजेच नवीन स्मार्ट कार्ड पूर्णपणे बंधनकारक असेल:

  • महिला प्रवासी (ज्यांना तिकीट दरात ५०% सवलत मिळते)
  • ज्येष्ठ नागरिक (६५ ते ७५ वर्षे वयोगट)
  • अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील सर्व नागरिक – मोफत प्रवास)

​आतापर्यंत ५१ लाख नागरिकांची नोंदणी

​या मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रात वेग आला असून, आतापर्यंत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यापैकी २५ लाख कार्ड आधीच सक्रिय (Activate) करण्यात आली आहेत. उर्वरित नागरिकांनी देखील विलंब न करता आपली कार्ड सक्रिय करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

​कार्ड कुठे आणि कसे काढायचे? (How to Apply for ST NCMC Card)

​अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे की हे कार्ड घरबसल्या ऑनलाईन काढता येते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

महत्त्वाची टीप: हे स्मार्ट कार्ड तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन काढता येणार नाही. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी डेपोमध्ये (ST Depot) जावे लागेल किंवा महामंडळाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजंटकडे जाऊनच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हे कार्ड घ्यावे लागेल.

​राज्यभरात ४,००० हून अधिक केंद्रे सुरू

​ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४,००० पेक्षा जास्त केंद्र सक्रिय करण्यात आली आहेत. येथे प्रवासी आपली नोंदणी करून कार्ड प्राप्त करू शकतात.

​गैरव्यवहार करणाऱ्या केंद्रांवर होणार कडक कारवाई!

​परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे उकळणाऱ्या वितरण केंद्रांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांचा परवाना त्वरित रद्द करण्यात येईल.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

​प्रवाशांना आवाहन

​एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरू राहण्यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड डेपोमधून प्राप्त करून घ्यावे आणि ते तातडीने सुरू (Activate) करून घ्यावे.

हे देखील वाचा: खत बुकिंग अ‍ॅप 2026: ऑनलाईन नोंदणी, बुकिंग प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Leave a Comment