Farmer ID Card Download – राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली होती, त्यांना आता त्यांच्या युनिक आयडीचे अधिकृत संदेश मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता ‘फार्मर आयडी कार्ड’ कसे डाउनलोड करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. चला तर मग या प्रक्रियेची आपण सविस्तर माहिती घेऊ.
फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?
राज्य सरकारकडून ‘अग्रिस्टॅक योजने’अंतर्गत फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या कार्डामार्फत शेतकऱ्याची जमीन माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, मालकी हक्क, आणि इतर शेतीसंबंधित सर्व माहिती एका ठिकाणी संग्रहित केली जाते. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना भविष्यातील विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे?
● फार्मर आयडी डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://apfr.agristack.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
● त्यानंतर आपला आधार क्रमांक टाका.
● जर तुम्ही यापूर्वी Farmer ID साठी नोंदणी केली असल्यास, आधार क्रमांक टाकताच तुमची नोंदणी माहिती आणि युनिक फार्मर आयडी तुम्हाला स्क्रीनवर लगेच पहायला मिळेल.
● सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नसल्यामुळे आधी दिलेली माहितीच तुम्हाला दाखवली जाईल.
फार्मर आयडी PDF कशी डाऊनलोड करायची?
● त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘View Details’ या पर्यायावर क्लिक करा.
● आता तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
● वरील बाजूस ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ हे पर्याय दिसतील.
● ‘Download PDF’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करू शकता आणि आवश्यक असल्यास प्रिंट काढू शकता.