लाडक्या बहिणींनो eKYC करताना चूक झाली आहे? अशा पद्धतीने करा करा दुरुस्ती, स्टेप बाय स्टेप प्रोसेस Ladki Bahin Yojana eKYC Correction

Ladki Bahin Yojana eKYC Correction: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना त्यांचे eKYC करणे अनिवार्य आहे. अनेक लाभार्थ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, अजूनही लाखो महिलांचे हे काम बाकी आहे, ज्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत आहे.

​दरम्यान, ज्या महिलांनी eKYC पूर्ण केले आहे, परंतु त्यात माहिती भरताना काही चूक झाली आहे किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. eKYC मध्ये चूक असल्यास लाभार्थी महिलांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे, अशा महिलांना त्यांच्या eKYC मधील चूक सुधारण्यासाठी, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक नवीन पर्याय (वन-टाईम एडिट) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

​जर तुमच्या eKYC मध्येही कोणतीही चूक झाली असेल, तर तुम्ही ती खालीलप्रमाणे दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरून दुरुस्त करू शकता.

eKYC मधील चूक सुधारण्याची सोपी प्रक्रिया

​लाडकी बहीण योजनेच्या eKYC मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी (One Time Edit Option) खालीलप्रमाणे स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया पूर्ण करा:

अधिकृत वेबसाइटवर भेट द्या

• ​सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

दुरुस्ती पर्यायावर क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

• ​वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला “ईकेवायसी करताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम येत असल्याने चूक झाल्यास…” असे लिहिलेले दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

आधार आणि कॅप्चा माहिती भरा

• ​नवीन विंडोमध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) दिलेल्या बॉक्समध्ये अचूक भरायचा आहे.

फॉर्ममध्ये माहिती संपादित करा

• ​माहिती भरल्यानंतर, तुमच्यासमोर तुमचा eKYC फॉर्म पुन्हा ओपन होईल.
• ​या फॉर्ममध्ये, जी माहिती चुकीची भरली गेली आहे, ती तुम्ही बदलून (Edit करून)नवीन आणि खरी माहिती भरायची आहे.
• ​सर्व आवश्यक बदल केल्यानंतर, तुम्हाला विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

फॉर्म सबमिट करा

• ​सर्व माहिती तपासल्यानंतर आणि योग्य बदल केल्यानंतर, तुम्हाला फॉर्म सबमिट (Submit) करायचा आहे.
• ​फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर, तुमच्या eKYC मधील चूक दुरुस्त होईल.

दुरुस्तीसाठी महत्त्वाची अट आणि अंतिम मुदत

​eKYC मधील चूक सुधारण्यासाठी शासनाने एक महत्त्वाची अट ठेवली आहे, जी लाभार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे:

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

• ​एकच संधी: लाडकी बहीण योजनेत महिलांना eKYC मध्ये सुधारणा करण्याची संधी फक्त एकदाच (One Time) मिळणार आहे. त्यामुळे, दुरुस्ती करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरावी.
• ​अंतिम तारीख: ही एकवेळ सुधारणा करण्याची सुविधा 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत तुम्हाला ही दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्यांनी eKYC केले आहे आणि त्यात काही चूक झाली आहे, त्यांनी लवकरात लवकर या सुविधेचा लाभ घ्यावा आणि योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये.

➡️ लेक लाडकी योजना, लाभार्थ्यांच्या खात्यात येणार 5000 रुपये, जीआर आला

Leave a Comment