पीएम किसानचे 2000 आले नाहीत? अशी तक्रार करा…पैसे खात्यात जमा होतील PM Kisan 21st installment check

PM Kisan 21st installment check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी केला. प्रत्येक शेतकऱ्याला थेट 200 रुपये मिळणे अपेक्षित होते.

पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. चिंता करू नका. तुमचे पैसे अडकले असतील तरी घरी बसून एका मिनिटात तक्रार दाखल करून ते मिळवता येतील.

का अडकला हप्ता? ही आहेत मुख्य कारणे

1) ई-केवायसी पूर्ण झालेली नाही
2) आधार कार्ड बँकेशी लिंक नाही
3) आधार आणि बँक खात्यातील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक
4) बँक खाते बंद किंवा IFSC कोड बदलला
5) नोंदणी फॉर्ममध्ये चुकीची माहिती
6) जमिनीची पडताळणी प्रलंबित

या छोट्या तांत्रिक त्रुटींमुळे हप्ता थांबतो. पण सरकारने यावरती सोपे निराकरण केले आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

अवघ्या 60 सेकंदात तक्रार नोंदवा

• मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन पीएम किसानचे अधिकृत पोर्टल उघडा (pmkisan.gov.in)
• मुख्यपृष्ठावर उजवीकडे ‘Help Desk’ किंवा ‘Grievance’ पर्याय दिसेल, त्यावर
• ‘Lodge New Grievance’ वर जा
• आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक टाका
• समोर येणाऱ्या ड्रॉप डाउनमधून तुमची समस्या निवडा (उदा. ‘Payment not received’, ‘eKYC pending’, ‘Aadhaar-Bank mismatch’)
• ‘Submit’ वर क्लिक करा

लगेच तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. त्याच नंबरने तुम्ही तक्रारीची स्थिती तपासू शकता. बहुतेक तक्रारी 7 ते 15 दिवसांत निकालात निघतात आणि पैसे खात्यात जमा होतात.

हप्ता आला की नाही, असे लगेच तपासा

pmkisan.gov.in वेबसाईट ओपन करा
• ‘Know Your Status’ वर जा
• नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका
• ‘Rft Signed’ किंवा ‘Payment Success’ दिसले तर पैसे आले आहेत, अन्यथा ‘Pending’ दिसेल

मदत हवी असल्यास हेल्पलाइन टोल फ्री नंबर:

1800-115-526/011-23381092 (सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत)शेतकरी बंधूंनो, एक मिनिट काढा, तक्रार नोंदवा आणि तुमच्या 2000 रुपयांचा लाभ सुरु ठेवा

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

➡️ पिकविम्याची रक्कम आली खात्यात; येथे क्लिक करून तुमचं नाव तपासा

Leave a Comment