ग्रामपंचायत घरकुल यादी डाउनलोड करा मोबाईलवरुन PM Awas Gramin Lists Check

PM Awas Gramin Lists Check: भारत सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ (PMAY-G) ची 2025 ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 2016 मध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वी ती ‘इंदिरा आवास योजना’ म्हणून ओळखली जात होती.

या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्की (स्थायी) घरे उपलब्ध करून देणे आहे. या घरांच्या बांधकामासाठी सरकार मैदानी भागांमध्ये 1.2 लाख तर डोंगराळ प्रदेशात 1.3 लाख पर्यंतची मदत देते. पीआयबीनुसार, योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 3 कोटींहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सरकारचे 2029 पर्यंत 2.95 कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचे लक्ष्य आहे.

नविन लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर

‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’साठीची 2025 ची नवी लाभार्थी यादी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे. या यादीत पात्र कुटुंबांना पक्के घर मिळण्यासाठी आवश्यक मंजुरींचा समावेश आहे. लाभार्थी आता अधिकृत पोर्टलवर आपले नाव तपासू शकतात. नवीन यादीमुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माण प्रक्रियेला अधिक वेग आणि पारदर्शकता मिळणार आहे.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

घरकुल यादी मध्ये नाव चेक करा; PM Awas Gramin Lists Check & download

• प्रथम घरकुल योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा (pmayg.nic.in)
• ‘Stakeholders’ सेक्शनवर क्लिक करा आणि ‘IAY/PMAYG Beneficiary’ किया ‘Search Beneficiary’ निवडा
• रजिस्ट्रेशन नंबर नसताना ‘Advanced Search’ वर क्लिक करा.
• आपले राज्य, जिल्हा, ब्लॉक (तालुका) आणि गाव निवडा.
• कॅप्चा भरून ‘Submit’ वर क्लिक करा.

• जेव्हा यादी स्क्रीनवर दिसेल – त्या पेजवर ‘Download’ किंवा ‘Export’ पर्याय असेल (Excel / PDF स्वरूपात) – त्यावर क्लिक करून यादी डाउनलोड करू शकता.

लाभार्थी यादीमध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, हप्त्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल.

ladki bahin yojana june installment date 2026
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा हप्ता जमा होणार, शासन निर्णय आला ladki bahin yojana june installment date 2026

➡️ रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? सर्व माहिती SMS द्वारे आता मोबाईलवर

Leave a Comment