आता प्रत्येक मुलीच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये! लाभ घेण्यासाठी लगेच अर्ज करा; अर्ज प्रक्रिया आणि पात्रता वाचा; Lek ladaki yojana

Lek ladaki yojana: राज्य सरकारने मुलींच्या पालकांसाठी सुरू केलेल्या ‘लेक लाडकी योजने’चे अर्ज सुरू झाले आहेत. ही योजना मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करते.

1. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि पात्रता

लाभार्थी- मुलीचे आई-वडील (पालक)
• प्रत्येक मुलीला एकूण ₹ 1,01,000 पर्यंत टप्प्याटप्प्याने लाभ. (तीन मुली असल्यास ₹ 3,03,000 पर्यंत लाभ मिळू शकतो.)
• मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. (ही सर्वात महत्त्वाची अट आहे).
• लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 1,00,000 (एक लाख) पेक्षा जास्त नसावे.
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
• पहिल्या दोन मुलींना लाभ मिळतो. दुसऱ्या वेळी जुळी मुली झाल्यास, तिन्ही मुलींना लाभ मिळतो.
• पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळी ‘कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र’ सादर करणे अनिवार्य.
• मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी ती अविवाहित असावी (स्वयंघोषित पत्र आवश्यक).

2. टप्प्याटप्प्याने मिळणारा आर्थिक लाभ (प्रति मुलगी)

ही योजना पाच टप्प्यांत (टक्केवारीत नाही, तर वयाच्या किंवा शिक्षण टप्प्यानुसार) लाभ देते:

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

• मुलीचा जन्म झाल्यानंतर – ₹ 5,000
• मुलगी शाळेत (पहिली) जाऊ लागल्यावर – ₹ 4,000
• मुलगी सहावीत गेल्यावर – ₹ 6,000
• मुलगी अकरावीत गेल्यावर – ₹ 8,000
• मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर – ₹ 75,000
• एकूण रक्कम – ₹ 1,01,000

3. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे

• फॉर्म: हा फॉर्म महिला व बाल विकास विभागामार्फत उपलब्ध आहे (चार पानांचा). तुम्ही याची प्रिंट काढून अर्ज जमा करायचा आहे.
• फॉर्म कुठे जमा करायचा: अर्ज तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे. अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज स्वीकारतील आणि तुम्हाला पोचपावती देतील.

महत्त्वाची कागदपत्रे:

• लाभार्थ्याचा जन्माचा दाखला.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला.
• मुलीच्या आधार कार्डची छायांकित प्रत.
• बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
• पिवळे/केशरी रेशन कार्डची साक्षांकित प्रत.
• मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत.
• संबंधित शैक्षणिक टप्प्यासाठी शाळेचा दाखला (बोनाफाईट).
• कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार).

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

बँक खाते सूचना: बँक खाते आधार कार्डशी संलग्न (Aadhaar Seeded) असणे अनिवार्य आहे. तुम्ही यासाठी पोस्ट ऑफिस किंवा एसबीआय (SBI) सारख्या बँकेत खाते उघडू शकता. ही योजना मुलींच्या भविष्यासाठी खरोखरच एक मोठी मदत आहे. फॉर्ममध्ये कोणतीही चूक न करता सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करणे महत्त्वाचे आहे.

➡️ घरकुल योजना: घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणार 1 लाखांचे अनुदान, अर्ज करा

Leave a Comment