Ladki Bahin Yojana KYC New Process: लाडकी बहीण योजना e-KYC कशी करावी? सोप्पी ही पद्धत वापरा

Ladki Bahin Yojana KYC New Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे अत्यंत आवश्यक आहे. केवायसी करण्याची मुदत आता जवळ येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच अगदी सोप्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याची संपूर्ण A to Z प्रोसेस खालीलप्रमाणे दिली आहे:

Ladki Bahin Yojana KYC New Process

पायरी 1: योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा

• सर्वात प्रथम, तुमच्या मोबाईलमध्ये Google उघडा.
• सर्च बारमध्ये फक्त “लाडकी बहीण” असे सर्च करा.
• सर्वात पहिली जी वेबसाईट दिसेल, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” त्यावर क्लिक करा. (https://ladakibahin.maharashtra.gov.in)
• वेबसाईटवर आल्यावर, तुम्हाला एक मोठा बॉक्स दिसेल: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.

पायरी 2: लाभार्थी (बहिणीची) माहिती भरा

• लाभार्थी आधार क्रमांक: या बॉक्समध्ये लाडक्या बहिणीचा आधार नंबर अचूक टाका.
• कॅप्चा (Captcha): स्क्रीनवर दिसणारे आकडे किंवा अक्षरे जशीच्या तशी पुढील बॉक्समध्ये टाका.
• संमती द्या: खालील “मी सहमत आहे” या बटनावर टिक (Tick) करा.
• ओटीपी पाठवा: आता “ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.

टीप: कधीकधी ओटीपी येण्यास उशीर होतो किंवा तांत्रिक अडचणी येतात. अशा वेळी तुम्ही सकाळी लवकर (पहाटे) किंवा रात्री 11 नंतर प्रयत्न करू शकता.

जीडीएस भरती 2026
जीडीएस भरती 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पासवर 28,000+ जागा, असा करा ऑनलाइन अर्ज!

पायरी 3: वडिलांचा/पतीचा आधार प्रमाणीकरण (Authentication)

• आधार ओटीपी: तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी बॉक्समध्ये टाकून ‘सबमिट’ करा.
• वडील/पतीचा आधार: आता तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल.
• वडील किंवा पती (जे कोणी असतील) त्यांचा आधार क्रमांक येथे टाका.
• पुन्हा कॅप्चा टाका आणि “मी सहमत आहे” वर टिक करा.
• “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा.
• पती/वडिलांचा ओटीपी: वडील किंवा पती यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी बॉक्समध्ये टाकून ‘सबमिट’ करा.

महत्त्वाची नोंद: ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने अद्याप कोणताही वेगळा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे, असा पर्याय आल्यास तुम्हाला थांबावे लागेल.

पायरी 4: जात प्रवर्ग आणि घोषणा

• जात प्रवर्ग (Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग ( Caste Category) निवडायचा आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या पर्यायांपैकी तुमचा योग्य प्रवर्ग निवडा.
• दोन महत्त्वाचे प्रश्न: तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील.
• पहिला प्रश्न: याचे उत्तर ‘होय’ सिलेक्ट करा.
• दुसरा प्रश्न: याचे उत्तर सुद्धा ‘होय’ सिलेक्ट करा.
• अटी मान्य करा: खालील “उपरोक्त क्रमांक 1 व 2 मधील अटी मान्य आहेत” या बॉक्सवर टिक करा.
• सबमिट करा: आता “सबमिट करा” वर क्लिक करा.

पायरी 5: पडताळणी स्थिती तपासा

तुम्ही सबमिट करताच, तुमच्या स्क्रीनवर “तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची ई-केवायसी आता पूर्ण झाली आहे!

केवायसी झाली आहे की नाही, कसे तपासावे?

• पुन्हा पहिल्या पायरीनुसार वेबसाईटवर जा आणि क्लिक करा.
• तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाका आणि ओटीपी पाठवा.
• तुम्ही “ओटीपी पाठवा” वर क्लिक करताच, तुम्हाला “तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे” असा संदेश दिसेल.

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

टीप: eKYC करताना तुम्हाला काय अडचण (Error) येत आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतरांनाही त्याबद्दल माहिती मिळेल.

➡️ लाडकी बहीण योजना E-KYC अंतिम तारीख जाहीर; शेवटची संधी लवकर केवायसी करा

Leave a Comment