PMFBY Maharashtra crop insurance payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे 921 कोटी मिळाले, तुम्हाला मिळाले का? यादीत नाव चेक करा

PMFBY Maharashtra crop insurance payment: 11 ऑगस्ट 2025 रोजी, प्रधानमंत्री पीकविमा योजना (PMFBY) अंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील विम्याची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित विशेष कार्यक्रमात, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत हा निधी वितरित करण्यात आला

देशभरातील वाटपाचा आढावा

या टप्प्यात 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 3,900 कोटींचा विमा देण्यात आला. यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे

• महाराष्ट्र – शेतकऱ्यांसाठी 921 कोटींची मंजुरी
• मध्य प्रदेश – सर्वाधिक 1,156 कोटी
• राजस्थान – 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 1,100 कोटी
• छत्तीसगड – 150 कोटी
• इतर राज्ये – एकत्रित 773 कोटी

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामगिरी (Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2025)

2016 साली सुरू झालेल्या या योजनेत आजवर 78 कोटींपेक्षा जास्त अर्जांना मंजुरी मिळाली आहे

• शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम: 35,864 कोटी
• दिलेली विमा रक्कम: 1.83 लाख कोटी
• म्हणजेच शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम प्रीमियमपेक्षा सरासरी 5 पट जास्त आहे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ

या 921 कोटींच्या निधीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना पीकहानीचा आर्थिक भार कमी होईल. अनिश्चित पावसामुळे, कीडरोगांच्या हल्ल्यामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा विमा उपयोगी ठरेल. थेट खात्यात पैसे मिळाल्यामुळे प्रक्रिया पारदर्शक व जलद झाली आहे

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

PMFBY Maharashtra crop insurance payment Check

तुम्ही प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी असाल, तर आपल्या बँक खात्याची स्थिती तपासा. रक्कम जमा झाल्याची खात्री करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप किंवा जवळच्या बँक शाखेत चौकशी करा

➡️ ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो? – पहा नविन नियम

Leave a Comment