Maharashtra weather update: महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय झाल्याने अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर दिसून येणार असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही देण्यात आले आहेत.
कोकण परिसरात पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 100 ते 150 मिमीपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
➡️ तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपये मिळणार की नाही? 2 मिनिटांत नाव चेक करा
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नद्या व नाल्यांना पूर येण्याचा धोका असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
मराठवाड्यातील बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर येथे दिवसभर हलक्या ते मध्यम सरी राहणार असून, रात्रीच्या सुमारास काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. धाराशिव व लातूर येथे मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यांत हलका पाऊस तर जळगावमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी राहतील.
हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह काही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना
शेतकऱ्यांनी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा निचरा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. शेतातील नाले, गटारे स्वच्छ करून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी पीक संरक्षणाची उपाययोजना करावी. शेतीकामकाज शक्य असल्यास काही दिवस पुढे ढकलावे. हवामान खात्याच्या अपडेटवर सतत लक्ष ठेवा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. योग्य तयारीने पावसाचा फटका टाळता येईल.
➡️ लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 की 2100 मिळणार? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी