Ration Card Cancelled या मोठ्या अपडेटमुळे राज्यातील लाखो शिधापत्रिका धारकांना मोठा धक्का बसला आहे. ई-केवायसी मोहिमेदरम्यान राज्य सरकारने 18 लाख रेशन कार्ड रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक अपात्र लाभार्थ्यांनी सरकारी धान्याचा गैरवापर केल्याचं उघड झालं असून त्यावर सरकारने थेट कारवाई केली आहे.
ई-केवायसी मोहिमेमुळे अनेक अपात्र रेशन कार्ड रद्द
राज्यातील शिधापत्रिका धारकांचे ई-केवायसी (e-KYC) सध्या जोरात सुरु आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख, आधार क्रमांक, उत्पन्न इत्यादी माहिती तपासली जात आहे. याच प्रक्रियेमध्ये खालील बाबी समोर आल्या:
• मृत व्यक्तींच्या नावावर धान्य घेतले जात होते
• मोठा पगार असलेले सरकारी कर्मचारी, शिक्षक, खासगी अधिकारी लाभ घेत होते
• व्यापारी आणि व्यावसायिक देखील शिधा योजनेचा गैरफायदा घेत होते
ही सर्व माहिती समोर आल्यानंतर 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रेशन कार्ड रद्द?
रेशन कार्ड रद्द मोहिमेमध्ये काही जिल्ह्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे:
• मुंबई: 4.80 लाख रेशन कार्ड रद्द
• ठाणे: 1.35 लाख रद्द
• एकूण: 6.85 कोटी शिधा पत्रिकांपैकी 5.20 कोटींचे ई-केवायसी पूर्ण
• 1.65 कोटी रेशन कार्डची प्रक्रिया अजूनही प्रलंबित
गैरफायदा घेणाऱ्यांवर सरकारचा दंडुकाच
सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे, अशा कुटुंबांनी गरिबांसाठी असलेल्या या योजनेपासून दूर राहावं. बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या कार्डांमुळे बांगलादेशी नागरिकांनाही लाभ मिळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई गरजेची होती.
ई-केवायसीसाठी मुदतवाढ
राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली आहे. अद्याप ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने नजीकच्या केंद्रात जाऊन (Ration Card e-Kyc) प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचेही Ration Card Cancelled होऊ शकते.
➡️ तुमच्या रेशन कार्डचा रंग कोणता? जाणून घ्या रंगानुसार मिळणारे फायदे Ration Card Color and Benefits