650 CIBIL Score for Personal Loan: वैयक्तिक कर्जासाठी 650 सिबिल स्कोअर पुरेसं आहे का?

650 CIBIL Score for Personal Loan: पर्सनल लोनसाठी 650 सिबिल स्कोअर पुरेसं आहे का? अनेक लोकांना याबद्दल सखोल आणि योग्य माहिती मिळत नाही. आज आपण पाहणार आहोत की 650 CIBIL स्कोअर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी योग्य आहे का? कोणत्या बँका किंवा NBFCs कर्ज देतात आणि तुमचा स्कोअर कसा चांगला कराल. CIBIL Score हा तुमच्या क्रेडिट हिशोबाचा संपूर्ण इतिहास दर्शवतो. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो.

CIBIL स्कोअरचे 5 प्रकार – तुमचा स्कोअर कसा आहे ते समजून घ्या!

CIBIL Score RangeClassification
750 आणि त्याहून अधिकExcellent (उत्कृष्ट स्कोअर)
700-749Good (चांगला स्कोअर)
650-699Average (सरासरी स्कोअर)
600-649Poor (खराब स्कोअर)
300-599Very Poor (खुपच खराब स्कोअर)

वैयक्तिक कर्जासाठी 650 CIBIL स्कोअर हा सरासरी मानला जातो. म्हणजेच तुम्ही कर्जासाठी पात्र असू शकता, पण काही अटी लागू होऊ शकतात.

650 CIBIL स्कोअर वर कर्ज मिळू शकते का?

हो, 650 चा CIBIL स्कोअर असतानाही वैयक्तिक कर्ज मिळू शकते. मात्र यावेळी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात

• नोकरीची स्थिरता: तुम्ही नियमित पगार घेत असाल (Regular Income) आणि चांगल्या कंपनीत काम करत असाल तर स्कोअर थोडा कमी असतानाही कर्ज (minimum credit score personal loan) मिळू शकते.
अधिक उत्पन्न: जास्त पगार असल्यास, बँक कर्ज लवकर मंजूर करू शकते.
कर्जाची रक्कम कमी हवी असल्यास: कमी रकमेचं कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते.
• को-सिग्नर / Guarantor असेल तर: जर दुसऱ्या कोणाचा स्कोअर चांगला असेल, आणि तो तुम्हाला Guarantor असेल तर शक्यता वाढते.
• NBFCs आणि Fintech कंपन्या: अशा कंपन्या बँकेपेक्षा लगेच लोन मंजूर करून देऊ शकतात.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

650 CIBIL स्कोअरवर वैयक्तिक कर्ज मिळाल्यास व्याजदर कसा असेल?

• स्कोअर जितका कमी, तितका व्याजदर अधिक असतो.
• 650 CIBIL स्कोअर असणाऱ्यांसाठी व्याजदर 15% ते 28% पर्यंत जाऊ शकतो.
• काही NBFCs प्रीमियम शुल्क, प्रोसेसिंग फीही जास्त आकारतात.

कोणत्या बँका किंवा NBFCs 650 CIBIL स्कोअरवर कर्ज देतात?

➤ Fintech / NBFC कंपन्या

• Bajaj Finserv
• MoneyTap
• Paysense
• KreditBee
• CASHe

➤ बँका

• Full-fledged बँका शक्यता कमी असते, पण SBI, HDFC, ICICI बँका काही वेळा कमी स्कोअर (Low Credit Score) वर देखील “pre-approved” offers देतात.

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी 7 टिप्स

• वेळेवर EMI भरा
• क्रेडिट कार्ड खर्चाचा वापर 30% पेक्षा कमी ठेवा
• जुन्या क्रेडिट हिस्ट्री जपून ठेवा
• अनेक कर्जांसाठी एकाच वेळी अर्ज करू नका
• चुका असलेले क्रेडिट रिपोर्ट्स त्वरित दुरुस्त करा
• विविध प्रकारचं क्रेडिट (Loans) वापरा (secured + unsecured)
• नियमितपणे CIBIL रिपोर्ट तपासा

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

650 CIBIL Score for Personal Loan

जर तुमचा CIBIL स्कोअर 650 असेल, तर वैयक्तिक कर्ज मिळू शकतं, पण अटीसह – व्याजदर जास्त, प्रोसेसिंग फी जास्त. म्हणूनच, शक्य असल्यास कर्ज घेण्याआधी क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करा. एकदा स्कोअर 750+ झाला की तुम्हाला कर्जासाठी अधिक चांगले पर्याय आणि कमी व्याजदर मिळू शकतो.

➡️ SBI, ICICI किंवा PNB – कोणती बँक देत आहे सर्वात स्वस्त पर्सनल लोन? 1 लाखासाठी EMI किती लागेल?

Leave a Comment