छोट्या व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत कर्ज; काय आहे उद्योगिनी योजना? अर्ज कसा कराल? Udyogini loan scheme

Udyogini loan scheme: उद्योगिनी योजना (Udyogini Scheme) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 88 प्रकारचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून कर्ज दिलं जातं. या योजनेची सुरुवात प्रथम कर्नाटक सरकारने केली होती, आणि त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात ती राबवायला सुरुवात केली आहे.

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होतो, कारण त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी कर्ज मिळवणे सुलभ होते.

उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा Udyogini loan eligibility

• या योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

• अर्ज करणाऱ्या महिलेचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

• विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग महिला यांच्यासाठी उत्पन्न मर्यादा लागू नाही. या महिलांना व्याजमुक्त कर्ज दिलं जातं.

• इतर महिलांना 10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज दिलं जातं, जो संबंधित बँकेच्या नियमांनुसार ठरतो.

• अर्जदार महिलेचं वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावं.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

• चांगला क्रेडिट स्कोअर असणं आवश्यक आहे; पूर्वी घेतलेलं कर्ज थकित असल्यास नवीन कर्ज दिलं जाणार नाही.

योजनेमागील उद्देश

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं. उद्योगिनी योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. यामुळे केवळ महिलांचे सक्षमीकरण होत नाही, तर ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता वाढीस लागते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

उद्योगिनी योजनेत अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

• अर्जासह दोन पासपोर्ट साइज फोटो

• आधार कार्ड आणि जन्माचा दाखला

• शिधापत्रिका (BPL असल्यास)

• उत्पन्नाचा दाखला

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

• रहिवासी दाखला

• जात पडताळणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा?

महिलांनी या योजनेअंतर्गत कर्जासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकेत संपर्क साधावा. अनेक वित्तीय संस्था, जसे की बजाज फायनान्स, या योजनेअंतर्गत कर्ज पुरवतात. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घ्यावं.

Udyogini Scheme for women

उद्योगिनी योजना ही महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण असो वा शहरी, कोणतीही महिला योग्य पात्रता पूर्ण करत असेल, तर ती या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते.

➡️ मिळवा 5 लाखापर्यंत कर्ज, किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा?

Leave a Comment