विहीर खोदण्यासाठी मिळवा 4 लाखांचे सरकारी अनुदान! पहा अर्ज प्रक्रिया Shetkari Vihir Yojana Subsidy

Shetkari Vihir Yojana Subsidy : आजची बातमी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विहीर खोदकामासाठी 4 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी संधी मिळेल. विशेषता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरणार आहे.

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय Shetkari Vihir Yojana Subsidy

राज्यामधील शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांसाठी महाराष्ट्र शासनाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी मोठा निर्णय घेतला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालाप्रमाणे राज्यामध्ये 3,87,500 इतक्या विहिरी अजूनही खोदल्या जाऊ शकतात. या निर्णयामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठा बदल होऊ शकतो.

योजनेचे उद्दिष्ट

शेतकरी बांधवांना सिंचनासाठी स्वतःची विहीर बांधून देण्यासाठी ही योजना मदत करेल. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पावसावर अवलंबून न राहता शेती करता येईल. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढेल आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात.

योजनेचे लाभार्थी कोण?

पुढील शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल

● अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी
● भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी
● दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबे
● विधवा किंवा महिला प्रमुख असलेली कुटुंबे
● अपंगत्व असलेल्या व्यक्तींची कुटुंबे
● इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
● अल्पभूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत जमीन असलेले)
● सीमांत शेतकरी (2.5 एकरपर्यंत जमीन असलेले)

अनुदान मिळण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी Shetkari Vihir Yojana eligibility

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील अटी पूर्ण कराव्या लागतील.

● अर्जदाराकडे मनेरगाव जॉब कार्ड असावे
● किमान 1 एकर शेत जमीन असणे आवश्यक
● याआधी त्या जागेवर विहीर नसावी तसेच, सातबारावर नोंद नसावी
● पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून किमान 500 मीटर असणे आवश्यक
● दोन विहिरींमधले अंतर हे किमान 150 मीटर पर्यंतचे असावे. (अनुसूचित जाती-जमाती आणि BPL कुटुंबांसाठी सूट मिळू शकते)
● सामुदायिक विहिरीसाठी किमान 40 गुंठे जमीन असावी (सर्व मिळून)

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

विहीर अनुदान रक्कम Shetkari Vihir Yojana Subsidy

राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी असल्या कारणामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत वेगळी समिती स्थापन केली जाईल. ही समिती विहिरीच्या आर्थिक व तांत्रिक बाबी ठरवेल. शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत पात्र प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त 4 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळू शकते.

अर्ज प्रक्रिया Shetkari Vihir Yojana Application Process

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा लागेल. लवकरच सरकारतर्फे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातूनही अर्ज करता येईल.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे Shetkari Vihir Yojana Required Documents

● सातबारा उतारा
● 8-अ उतारा
● मनरेगा जॉब कार्डची प्रत
● सामुदायिक विहिरीसाठी सहभागी शेतकऱ्यांचा करारनामा
● अर्जदाराचे सहमतीपत्र

ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना साध्या कागदावर अर्ज लिहून ग्रामपंचायतीकडे सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णयामध्ये अर्जाचा आणि सहमती पत्राचा नमुना देखील तुम्हाला उपलब्ध होईल.

विहीर मंजुरी आणि कामाचा कालावधी

जमा झालेल्या अर्जाची ग्रामपंचायतीकडून छाननी होईल आणि त्यानंतरच पात्र अर्जांना मंजुरी दिली जाईल. विहीर खोदकामासाठी 2 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यामध्ये विलंब झाला तर हा कालावधी 3 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

योजनेचे फायदे Shetkari Vihir Yojana Benefits

विनामूल्य विहीर – 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. त्यामुळे विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार नाही.
सिंचन सुविधा – पावसावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना वर्षभर शेती करता येईल.
उत्पादनात वाढ – नियमितच्या सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
बारमाही शेती – वर्षभर शेती करणे शक्य होईल.
आर्थिक उन्नती – उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
रोजगार निर्मिती – विहीर खोदकामामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

योजनेमधील आव्हाने व उपाय

यामुळे भूजल पातळी कमी होऊ शकते

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

सर्वच ठिकाणी भूजल पातळी एकसारखी असत नाही. काही भागांची ती खूप खालावलेली असते त्यामुळे, अशा भागामध्ये विहीर खोदण्यासाठी येणारा खर्च हा वाढू शकतो. यासाठी शासनाने जिल्हानिहाय योजनेमध्ये निकष ठरवलेले आहेत.

अर्ज प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी

सध्या ऑफलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अर्ज भरतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी, लवकरच शासनाकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ केली जाईल.

अनुदान वितरणामध्ये होणारा विलंब

विहीर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळण्यासाठी कोणताही विलंब होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाईल.

योजनेसाठी संपर्क Shetkari Vihir Yojana Helpline

अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात तुम्ही संपर्क करू शकता. तसेच मनरेगा हेल्पलाइनवर देखील तुम्हाला हवी असणारी योग्य माहिती मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत वरदान ठरणार आहे. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्याकडे लक्ष द्यावे, आणि आर्थिक सुस्थिती मिळवावी.

Leave a Comment