SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर, कर्जाचे व्याजदर  कमी; EMI होणार स्वस्त! जाणून घ्या नवीन दर SBI Loan Interest Rate 2025

SBI Loan Interest Rate 2025 – यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलासा देत रेपो दरामध्ये कपात केली होती. पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दरात ही सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 6.25% वरून 6.00% पर्यंत कपात केली आहे. त्यानंतर बँकांनीही आपले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे.

या अंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या RLLR (रेपो लिंक्ड लोन किंवा लेंडिंग रेट) दरामध्ये 0.25% कपात केली आहे. या बदलानंतर बँकेचा RLLR आता 8.25% वर आला आहे. या बदलाचा थेट फायदा SBI च्या विद्यमान आणि नव्या दोन्ही कर्जदारांना होईल. होम लोन असो, पर्सनल लोन असो किंवा ऑटो लोन असो, आता त्यावरील व्याजाचा दर थोडा कमी होईल, म्हणजेच EMI मध्ये ग्राहकांना दिलासा मिळू शकेल.

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

एसबीआयने काय बदल केले?

SBI ने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) 0.25 टक्के कमी करून 8.65 टक्के केला आहे. हा बदल 15 एप्रिल 2025 पासून अधिकृतपणे लागू केला आहे. आरबीआयने ही सलग दुसऱ्यांदा रेपो दरामध्ये 0.25% कपात केली आहे. अर्थात, SBI च्या या बदलामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

FD च्या व्याजदरात केलेत बदल

एकीकडे, SBI ने कर्ज स्वस्त करून आपल्या ग्राहकांना दिलासादायक भेट दिली आहे. तर दुसरीकडे, मुदत ठेवींवरील व्याजदर देखील 0.10%-0.25% कमी केले आहेत. हे नवीन दर 15 एप्रिल 2025 पासून अधिकृतपणे लागू झाले आहेत. आता 1 ते 2 वर्षांच्या FD वरील व्याजदर 6.70% असणार आहे, जो पूर्वी 6.80% होता. दरम्यान, 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 7% वरून 6.90% पर्यंत कमी केला आहे.

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

या 4 बँकांनी कमी केले व्याजदर

आरबीआयने रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात झाली आहे. एसबीआय सोबतच पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया (BOI), इंडियन बँक आणि युको बँक यांनी देखील कर्जाच्या व्याजदरामध्ये 0.25% पर्यंत कपात केली आहे.

Leave a Comment