Ration Card eKYC – रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य पुरवठा थांबवला जाईल, प्रशासनाचे आदेश; बातमी वाचा सविस्तर

Ration Card eKYC – स्वस्त धान्य योजनेचा जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने रेशनकार्ड ई-केवायसीची प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ई-केवायसी करण्यासाठी सरकार सांगत आहे, पण अध्यापही 30% लाभार्थ्यांनी रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण केली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल असे प्रशासनाने आदेश दिले आहेत. रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रियेमध्ये पुणे हा जिल्हा सर्वात मागे असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात 70% ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असली, तरी काही जिल्हे अजूनही मागे

प्रशासन सहा महिन्यांपासून रेशनकार्ड ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांना सांगत आहे. ई-केवायसी करण्याची मुदत वेळोवेळी वाढवून देऊनही अजून देखील ई-केवायसी पूर्ण करण्याचे प्रमाण 70% वरच असल्याचे दिसत आहे. यामध्ये ठाणे, भंडारा आणि वर्धा हे जिल्हे प्रगतीवर आहेत पण, पुणे जिल्ह्यात ही प्रक्रिया फक्त 54.42% इतकीच पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत किती आहे?

रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी 1 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली होती परंतु प्रशासनाने ही मुदत वेळोवेळी वाढवून आता ती 15 मार्चपर्यंत केली आहे.

Ration Kerosene Distribution 2026
रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! गॅस टंचाईमुळे रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार ‘रॉकेल’; जाणून घ्या कोणाला किती मिळणार? Ration Kerosene Distribution 2026

रेशनकार्ड धारकांनी आता काय करावे?

रेशनकार्डधारक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली तर धान्य मिळणार नाही असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

रेशनकार्ड ई-केवायसी कशी करावी?

रेशनकार्ड धारकांनी अजूनही ई-केवायसी पुर्ण केली नसेल तर, जवळच्या स्वस्त धान्य दुकानात 4G ई-पॉज मशीनद्वारे तुम्ही ती पूर्ण करू शकता. तसेच घरबसल्या देखील आपल्या मोबाईलवरून ही ई-केवायसीची प्रक्रिया अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करता येऊ शकते.

हे देखील वाचा : Ration Card E-Kyc Online : आपल्या मोबाईलवरुन करा ई-केवायसी, ती ही 2 मिनिटांत, पहा प्रोसेस

Maharashtra Ration Card DBT Scheme
रेशन लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! पैसे जमा होणार, अखेर GR आला Maharashtra Ration Card DBT Scheme

राज्यात सर्वाधिक ई-केवायसी पूर्ण असणारा जिल्हा

राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 70% हुन अधिक ई-केवायसीची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली असल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये ठाणे जिल्हा सर्वाधिक रेशन कार्ड ई-केवायसी करण्यामध्ये प्रगतीवर आहे.

रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य पुरवठा थांबवला जाईल, प्रशासनाचे आदेश

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 1 मार्चपर्यंत 70% पेक्षा जास्त ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, ज्यांनी अद्यापही रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ती 15 मार्चपूर्वी करून घ्यावी अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा थांबवण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

Leave a Comment