Ration Card E-Kyc Online : अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानातमार्फत धान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा म्हणून राज्य शासनाने शिधापत्रिका (Ration Card) ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
Ration Card E-Kyc करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे नागरिकांना ती आपल्या मोबाईलवरून करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला रास्त भाव दुकानात जाण्याची आवश्यक्ता नाही. ई-केवायसी करण्यासाठी शासनाद्वारे मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप सुरू झाले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून शिधापत्रिका ई-केवायसीची प्रक्रिया सहज पूर्ण करता येते.
Ration Card E-Kyc करणे का गरजेचे?
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ निश्चित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारक नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यामुळे या योजनेचा अयोग्य लाभ घेणाऱ्या नागरिकांना आळा बसेल.
शिधापत्रिका ई-केवायसी करण्यामागची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे
• योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अयोग्य लाभार्थ्यांचा अनधिकृत लाभ थांबवण्यासाठी शिधापत्रिका ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे.
• कुटुंबातील सदस्यांची नोंद ठेवण्यासाठी शिधापत्रिका ई-केवायसी आवश्यक आहे.
• यामुळे मृत सदस्यांचा समावेश काढून टाकता येईल तसेच नवीन सदस्य जोडण्यासाठी मदत होईल.
शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक असणारी ॲप्स
1. मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप
नागरिकांना हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून शिधापत्रिका ई-केवायसी प्रक्रिया सहज प्रकारे पूर्ण करता येईल.
2. आधार फेस आरडी सेवा ॲप
फेस स्कॅन करून ओळख पडताळणी करण्यासाठी आधार फेस आरडी सेवा ॲप महत्त्वाचे आहे
शिधापत्रिका ई-केवायसी प्रक्रिया Ration Card E-Kyc Online
शिधापत्रिका ई-केवायसीसाठी खालील प्रक्रिया तुम्हाला मदत करेल
• प्रथम मेरा ई-केवायसी ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
• त्यानंतर ॲप ओपन करा आणि आपले राज्य आणि जिल्हा निवडा.
• नंतर आपला आधार क्रमांक टाका, आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो टाका.
• त्यानंतर तुमची सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून ती सबमिट करा.
• त्यानंतर फेस ई-केवायसी हा पर्याय निवडा आणि आपला सेल्फी कॅमेरा सुरू करा.
• आपला चेहरा स्कॅन होण्यासाठी कॅमेरासमोर डोळे उघड-बंद करा.
• या सर्व प्रक्रियेनंतर आपली ई-केवायसी यशस्वी झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल.
शिधापत्रिका ई-केवायसी करण्याचे फायदे कोणते आहेत?
• घरबसल्या नागरिकांना आपल्या मोबाईल वरून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
• ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन नागरिकांना रेशन दुकानात जाण्याची आवश्यकता नाही.
• राज्यांमधील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये यामुळे पारदर्शकता वाढते.
• या योजनेअंतर्गत होणारा गैरवापर आणि फसवणूक टाळण्यासाठी मदत होते.
शिधापत्रिका ई-केवायसी करताना तुम्हाला कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
Ration Card E-Kyc करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
• ई-केवायसी करताना सरकारी मान्यताप्राप्त ॲप्सचाच वापर करा.
• आपला आधार क्रमांक आणि OTP योग्यरीत्या भरा.
• चेहरा स्कॅन करताना चांगल्या प्रकाशामध्ये असल्याची खात्री करा.
• शिधापत्रिका ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? याची खात्री करण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी यशस्वी झाल्याचा मेसेज आला आहे का? याची खात्री करा.
आजच शिधापत्रिका ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा
सरकारने Ration Card E-Kyc करण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी सोपी आणि सुलभ करून दिली आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलद्वारे काही मिनिटांतच घर बसल्या ई-केवायसीची प्रक्रिया ॲपच्या मदतीने पूर्ण करता येते. ई-केवायसी करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे नागरिकांनी वेळेत आपली आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून शिधापत्रिकेवरील मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय घेता येईल.