रेल्वेत तब्बल 9970 जागांसाठी मेगा भरती, पात्रता 10वी पास, या तारखेपर्यंत अर्ज करा Railway Bharti 2025

Railway Bharti 2025 – तुम्ही देखील रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रेल्वेमध्ये सहायक लोको पायलट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून 9970 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रेल्वेतील लोको पायलट पदासाठी भरतीची अधिसूचना 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जारी होईल. त्यानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे.

रेल्वे भरती बोर्डाच्या माहितीनुसार, भरतीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 10 एप्रिल 2025 पासून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2025 निश्चित करण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती अधिसूचना जारी झाल्यानंतरच सर्वांना मिळेल. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, सायकॉलॉजिल टेस्ट आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे केली जाईल.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

2024 मध्येही लोको पायलट पदांसाठी भरती निघाली होती. त्यावेळी जे उमेदवार अर्ज करू शकले नाहीत किंवा जे उमेदवार परीक्षा पास करु शकले नाहीत त्यांच्यासाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा केलेला असावा. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचना जाहीर झाल्यावरच मिळेल. रेल्वेमध्ये करिअरची सुरुवात करण्यासाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Marginal Farmer Certificate
Marginal Farmer Certificate: तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ नक्की काढा – जाणून घ्या फायदे!

Leave a Comment