PM Vishwakarma Yojana: सुतारकाम कारागिरांचा पर्याय पोर्टलवरून वगळला? जाणून घ्या सविस्तर

PM Vishwakarma Yojana – भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे PM Vishwakarma Yojana 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे, ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते, मात्र पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सुतार काम करणाऱ्यांसाठी कारपेंटर हा पर्याय काढून टाकण्यात आला होता, यावर अनेकांनी तक्रारी केल्यानंतर पुन्हा तो समाविष्ट करण्यात आला आहे.

PM Vishwakarma Yojana का सुरु केली?

केंद्र सरकारने पारंपरिक व लघुउद्योग तसेच, वेगवेगळे पारंपरिक व्यवसाय तसेच कारागिरांना चालना देण्यासाठी PM Vishwakarma Yojana सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन आहे. ही सुविधा CSC केंद्रामार्फत राबवली जात असून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट ग्रामपंचायत मध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जमा करून काही दिवसांनी त्याचे प्रशिक्षण दिले जाते

प्रशिक्षणानंतर त्याचा मोबदला म्हणून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते. त्याला परंपरेनुसार उद्योग करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत एक लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात येते. बऱ्याच कारागिरांनी याचा लाभ घेतला आहे, मात्र काही दिवसांपासून ऑनलाईन प्रक्रियेमधून कारपेंटर या व्यवसायाला काढून टाकण्यात आले आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालून कारपेंटर हा पर्याय ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सुतार बांधवांकडून करण्यात आली होती

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

हे देखील वाचा : Mini Tractor Anudan Yojana मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान, सविस्तर बातमी येथे पहा

CSC केंद्रावर अर्ज करता येत नाही..

सुतार काम हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे, मात्र पीएम विश्वकर्मा योजनेतून त्याला वगळण्यात आले आहे. संबंधितांनी पुन्हा एकदा सुतार कामाला या योजनेत स्थान द्यावे, त्यामुळे कारागिरांना त्याचा लाभ घेता येईलच. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी CSC केंद्रावर गेल्यानंतर अर्ज करता येत नाही यावेळी CSC केंद्र चालक दुसरा पर्याय निवडण्यास सांगतो, परंतु अनेक वर्षांपासून सुरू असणारा हा व्यवसायच या योजनेतून वगळल्यामुळे योजनेपासून वंचित राहावे लागत आहे, या योजनेबद्दल सुतार बांधवांकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : Farmer ID Card Download Process : मोबाइलवरुन शेतकरी ओळखपत्र 2 मिनिटांत करा डाऊनलोड

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

Leave a Comment