PM किसान योजनेतून हे शेतकरी वगळले, तब्बल अडीच लाख शेतकरी अपात्र; पहा कारण PM Kisan Beneficiary List

PM Kisan Beneficiary List: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 21वा हप्ता नुकताच देशभरातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. सुमारे 18 हजार कोटी रुपये वितरित झाले असले तरी, महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता आला नाही. यामागील धक्कादायक बाब म्हणजे; राज्यातील तब्बल 2,48,032 शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.

लाभार्थी संख्येत झालेली लक्षणीय घट

20वा आणि 21वा हप्ता यांच्यातील शेतकरी लाभार्थ्यांच्या संख्येतील फरक चिंताजनक आहे:

हप्तालाभार्थी शेतकरी
PM किसान – 20वा हप्ता92,89,273
नमो शेतकरी – मागील हप्ता91,65,156
PM किसान – 21वा हप्ता90,41,241

• केवळ एक हप्त्याच्या दरम्यान 2,48,032 शेतकरी अपात्र ठरले

‘शोध मोहीम’मुळे अनेक शेतकरी योजनाबाहेर

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार PM-KISAN योजनेअंतर्गत राबवलेल्या कठोर पडताळणी (शोध मोहीम) मुळे ही मोठी घट दिसून आली. अपात्र ठरलेल्यांमध्ये प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांचा समावेश:

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

• एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असलेले
• नावावर जमीन नसतानाही चुकीच्या नोंदी करून अर्ज केलेले
• मृत (मयत) शेतकरी अद्ययावत नोंदी नसल्याने यादीत राहिलेले
• ज्यांनी आपली जमीन विकली असूनही लाभ घेत राहिलेले

केंद्र आणि राज्य संयुक्त कारवाईमुळे फक्त पात्र आणि खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ देण्याची प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

‘नमो शेतकरी’ योजनेवरही परिणाम

या नवीन सुधारित यादीवर आधारितच पुढील काळात PM किसान योजनेचे पुढील हप्ते, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते वितरित केले जाण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत राहिली आहेत त्यांनाच दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

पुढे काय करावे?

जर तुमच्या खात्यात 21वा हप्ता आला नसेल तर;

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

• PM-KISAN पोर्टलवर तुमचा ई-केवायसी स्टेटस आणि लँड रेकॉर्ड पडताळणी तपासा
• नोंदीत त्रुटी असल्यास गाव कचेरी / CSC केंद्रातून सुधारणा करा
• PM-KISAN हेल्पलाइनवर चौकशी करू शकता – 15526 / 1800115526

PM Kisan Beneficiary List

PM-KISAN चा 21वा हप्ता वितरित झाला असला तरी महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांचे अपात्र ठरणे हा गंभीर विषय आहे. सरकारच्या शोध मोहिमेमुळे अपात्रता वाढली असली तरी पुढील काळात फक्त पात्र शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ मिळेल हे निश्चित झाले आहे.

➡️ खतांच्या भावात पुन्हा वाढ; कोणते खत किती रुपयांना? यादी पहा

Leave a Comment