खतांच्या भावात पुन्हा वाढ; कोणते खत किती रुपयांना? यादी पहा Latest Agriculture Fertilizer Price List

Latest Agriculture Fertilizer Price List: शेतकरी एकीकडे अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा मोठ्या संकटांना तोंड देत आहेत. त्यातच रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणखी वाढली आहे. हंगामाच्या तोंडावर झालेल्या या अचानक दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे.

खतांच्या भावात किती वाढ झाली?

• बहुतांश खतांच्या किंमतीत ₹200 ते ₹300 प्रति बॅग इतकी वाढ
• मिश्र खतांचे दर सर्वाधिक वाढले; मात्र शेतीमालाचे भाव अजूनही वाढले नाहीत
• कापूस, सोयाबीन, भाजीपाला इत्यादी पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

रब्बी हंगामावर परिणाम

पुढील काही दिवसांत गहू, हरभरा, कांदा अशा रब्बी पिकांना खतांची मोठी गरज भासणार आहे. परंतु;

• दर वाढले
• तुटवडा निर्माण झाला (दर वाढीमुळे शेतकऱ्यांच्या ऑर्डर कमी)
• बाजारात उपलब्धता कमी (जास्त ऑर्डर नसल्यामुळे खतांची कमी उपलब्धता)

यामुळे रब्बी हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

कंपन्यांचे लिंकिंग: शेतकरी त्रस्त, दुकानदारही अडचणीत

कंपन्यांकडून खतांसोबत खालील उत्पादनांचे जबरदस्ती लिंकिंग केलं जात आहे:

• वॉटर सोल्युबल खत
• मायक्रोन्यूट्रीएंट (Micro Nutrient)
• मायक्रोरायझा
• इतर पूरक उत्पादने

शेतकऱ्यांकडून या उत्पादनांचा ‘उठाव’ नसल्यामुळे दुकानदारांना हा माल खतांसोबत माथी मारावा लागत आहे.

युरिया खताच्या विक्रीत गोंधळ

सरकारच्या नियमानुसार युरियाची किंमत ₹266 पेक्षा जास्त नसावी. परंतु;

• वाहतूक खर्चासाठी स्वतंत्र भाडे मिळत नाही, त्यामुळे दुकानदारांना प्रति पोते ₹10–₹20 जास्त घ्यावे लागत आहेत. त्यावर शेतकऱ्यांची नाराजी

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

• दुसरीकडे, लिंकिंग उत्पादनांचा ताण पडत असल्याने दुकानदारही कमी प्रमाणातच खताची ऑर्डर देत आहेत. यामुळे खतांचा तुटवडा वाढत आहे.

Latest Agriculture Fertilizer Price List

या दरवाढीमुळे शेतकरी व दुकानदार दोघेही अडचणीत येत आहेत. हंगाम सुरु होण्याआधीच शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढत आहे

➡️ ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment