पीएम किसानचा 19वा हप्ता मिळाला, आता 20व्या हप्त्याचे 2000 या महिन्यात मिळू शकतात PM Kisan 20th installment

PM Kisan 20th installment – पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला. किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22,000 कोटी रुपये देण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांमध्ये 2.41 कोटी महिला लाभार्थी होत्या.

शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप झाली नसेल अशा शेतकऱ्यांचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये

कृषी विकासाला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी, दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांना सरकार 6000 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करते. यामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये रक्कम DBT द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते. प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने 2000 रुपये दिले जातात. राज्यांमधील लहान व सीमा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दिली जाणारी ही मदत महत्वपूर्ण आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गरजा भागवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना वरदान ठरली आहे.

पुढील हप्त्याची अधिकृत घोषणा सरकारकडून लवकरच अपेक्षित

24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता या योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता सरकारकडून केव्हा जाहीर केला जाईल याची अधिकृत तारीख अद्याप दिलेली नाही. योजनेच्या नवीन अपडेटसाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट देऊन योजनेतील नवीन अपडेट तपासात राहावे.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

पीएम किसान योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार?

19वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळाला पण आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. फेब्रुवारी 2025 ला 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता आता पुढील हप्ता म्हणजे 20वा हप्ता जून 2025 मध्ये अपेक्षित आहे. तर या योजनेचा 21वा हप्ता हा ऑक्टोबर 2025 मध्ये लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment