Farmer ID असेल तरच, पीएम किसानचे 2000 मिळणार, सरकारचे निर्देश PM Kisan 2025 Latest Update

PM Kisan 2025 Latest Update – देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणे रक्कम DBT द्वारे थेट खात्यात जमा केली जाते. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे ₹2000 शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 2 हप्त्यांमधील लाभ वितरण 4 महिन्यांच्या अंतराने दिला जातो. फेब्रुवारीमध्ये 19 व्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे, दरम्यान योजनेचा 20 वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या 2000 रुपयांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना 30 एप्रिलपूर्वी फार्मर आयडी बनवणे अनिवार्य आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांनाच मिळणार आहेत, असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवले नसेल त्यांना पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत.

फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करता येईल. शेतकऱ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. फार्मर आयडी शेतकऱ्यांना जवळच्या CSC केंद्रातुन बनवता येईल.

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

30 एप्रिलच्या आधी सर्व शेतकऱ्यांनी Farmer ID Card बनवने आवश्यक आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज द्वारे 30 एप्रिलपूर्वी फार्मर आयडी बनवून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) काढून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हाला कृषी विभाग, महसूल विभाग आणि CSC केंद्रामधून फार्मर आयडी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकते.

Leave a Comment