Pik Vima Policy Paid Or Approved : तुमची पीक विमा पॉलिसी ‘पेड’ किंवा ‘अप्रूव्ह’ दाखवते? याचा अर्थ काय? येथे पहा

Pik Vima Policy – शेतकरी आपल्या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा भरतात. त्यानंतर अर्जाची स्थिती पाहताना काही शेतकऱ्यांना ती ‘पेड’ अशी तर काही शेतकऱ्यांना ती ‘अप्रूव्ह’ अशी दाखवते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यावेळी अप्रूव्ह म्हणजे पिक विमा मंजूर झालाय का? तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊया

पिक विमा अर्जाची प्राथमिक प्रक्रिया

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकरी पिक विमा काढतात. पिक विमा अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर तो संबंधित विमा कंपनीकडे पाठवण्यात येतो. त्यानंतर त्या अर्जाची प्राथमिक तपासणी होते, यादरम्यान जेव्हा शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती तपासतात त्यावेळी त्यांना पेड किंवा अप्रूव्ह असे संदेश पाहायला मिळतात.

‘पेड’ म्हणजे काय?

जेव्हा शेतकरी पिक विम्याचे शुल्क भरतो त्यावेळी त्याला पॉलिसीची स्थिती पेड दाखवते, जर संबंधित विमा शुल्क भरले नसेल तर ती पॉलिसी अनपेड दाखवते. तर काही वेळा पॉलिसी अर्जामध्ये त्रुटी असल्या कारणामुळे अर्ज सुधारणा करण्यासाठी परत पाठवला जातो. त्या अर्जातील सुधारणा झाल्यानंतर तो पुन्हा विमा कंपनीकडे पाठवला जातो.

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

‘अप्रूव्ह’ म्हणजे विमा मंजूर झाला का?

विमा कंपनीला अर्ज मिळाल्यानंतर त्या अर्जाची संपूर्ण तपासणी केली जाते. शेतकऱ्याच्या शेताचे क्षेत्र, कागदपत्रे आणि इतर माहिती जर योग्य असेल तर तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो. अर्ज मंजूर होतो त्यावेळी त्याची स्थिती अप्रुव्ह दर्शवली जाते, पण याचा अर्थ तो मंजूर झाला असा नाही.

पिक विमा मंजुरीची पुढील प्रक्रिया

पॉलिसी मंजूर झाल्यानंतर 60 दिवसांच्या कालावधीमध्ये विमा कंपनी पॉलिसी अर्जाची तपासणी पूर्ण करते. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे योग्य असल्यास पिक विमा मंजूर होतो. परंतु विमा योजनेच्या कालावधी मधील तपासणीमध्ये विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेड स्थिती तीन ते चार महिने दिसत राहते.

पॉलिसी मंजूर झाली म्हणजे क्लेम मंजूर झाला का?

पॉलिसी मंजूर झाली याचा अर्थ फक्त विमा अर्ज वैध आहे असा होतो. त्यानंतरच्या पुढील टप्प्यात क्लेम प्रक्रिया सुरू होते. क्लेम मंजूर करण्यासाठी विमा कंपनी नुकसानीची तपासणी करत असते, ती योग्य आढळल्यास क्लेम मंजूर होत असतो अन्यथा तो रिजेक्ट होतो. तसेच चुकीची माहिती दिल्यास आणि कागदपत्रांची कमतरता आढळल्यास क्लेम रिजेक्ट होत असतो.

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे

ज्यावेळी तुम्ही पिक विमा भरता त्यानंतर नियमितपणे त्याची स्थिती तपासत रहा. मंजुरीसाठी आणि क्लेम अप्रूव्ह साठी आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करा. अप्रूव्ह म्हणजे क्लेम मंजुरी नसते, क्लेम मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया आवश्यक असते. पिक विमा मंजुरी आणि क्लेम मंजुरी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती असल्यास पिक विमा योजनेअंतर्गत मिळणारा लाभ त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय घेता येईल

Leave a Comment