नमो शेतकरी योजना, सहाव्या हप्त्याचा जीआर आला, योजनेचे 2000 जमा होणार Namo Shetkari Yojana 6th Installment

Namo Shetkari Yojana 6th Installment – गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासोबत यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय (Government GR) आज निर्गमित केला आहे. त्यामुळे लवकरच शेतक-यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळेल.

पीएम किसानच्या हफ्त्यासोबत (PM Kisan Scheme) नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता देण्यात येत होता. परंतु मागील हफ्त्यावेळी केवळ पीएम किसानचा हफ्ता शेतक-यांच्या खात्यावर दिला गेला. त्या दिवसांपासून नमोचा हफ्ता केव्हा येईल, असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. अखेर आज याबाबतचा शासन निर्णय जाहिर झाला आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025) आणि यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1642.98 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.

इथे वाचा सविस्तर शासन निर्णय

याआधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी या आधिच्या हप्तासाठी वितरीत निधीपैकी शिल्लक असलेल्या 653.50 कोटी निधी व्यत्तिरिक्त रक्कम 1642.98 कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online
येथे पहा शासन निर्णयClick Here

Leave a Comment