मोफत भांडी वाटप योजना पुन्हा अर्ज सुरू; येथे अर्ज करा Mofat Bhandi Yojana Apply

Mofat Bhandi Yojana Apply: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Maha BOCW) बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या मोफत भांडी वाटप योजना (Household Kit) ची वेबसाईट पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेत तुम्हाला 17 प्रकारांतील एकूण 30 वस्तूंचे भांडी संच (Kit) मिळणार आहेत. ( Mofat Bhandi Yojana Apply )

हा फॉर्म भरण्यासाठी आणि भांडी घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट (Appointment) घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अपॉइंटमेंट कशी बुक करायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. नोंदणी क्रमांक (Registration Number) कसा काढायचा?

फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कामगार नोंदणी क्रमांक (Worker Registration Number).

• वेबसाईटवर जा: सर्वात आधी https://mahabocw.in/ या प्रोफाईल लॉगिनच्या लिंकवर जा.
• माहिती भरा: यामध्ये तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
• ओटीपी (OTP) सत्यापित करा: ‘Proceed to Form’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून तो व्हॅलिडेट करा.
• नोंदणी क्रमांक मिळवा: लॉगिन झाल्यावर तुमचा भरलेला फॉर्म दिसेल. तुमचा फॉर्म ‘Active’ आणि ‘Approved’ असेल, तरच तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता. इथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) मिळेल. हा क्रमांक कॉपी करून घ्या.

2. भांडी वाटपसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट फॉर्म भरण्याची प्रक्रिया

भांडी वाटप किटसाठी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:

स्टेप 1: भांडी वाटप पोर्टलवर जा

• वेबसाईट: https://kit.mahabocw.in/appointment या अधिकृत लिंकवर जा.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

स्टेप 2: नोंदणी क्रमांक (Registration Number) भरा

• तुम्ही कॉपी केलेला कामगार नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) इथे टाका आणि बाहेर क्लिक करा.
• नोंदणीची माहिती: तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तुमचे नाव, नोंदणी/नूतनीकरणाचा दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर, जन्मतारीख आणि वय इत्यादी सर्व माहिती आपोआप (Automatically) स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 3: कॅम्प/शिबिर निवडा

• खाली आल्यावर ‘सिलेक्ट कॅम्प’ (Select Camp) या पर्यायातून तुम्हाला तुमच्या जवळचे किंवा सोयीचे असलेले शिबिर केंद्र (Camp) निवडावे लागेल.
• टीप: इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किंवा आसपासचे उपलब्ध कॅम्प दिसतील.

स्टेप 4: भेटीची तारीख (Appointment Date) निश्चित करा

• ‘अपॉइंटमेंट डेट’ वर क्लिक करा.
• कॅलेंडरमध्ये:
• लाल रंगाची तारीख म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे.
• पिवळ्या रंगाची तारीख म्हणजे त्या दिवसाच्या अपॉइंटमेंट्स फुल (Full) झाल्या आहेत.
• बाकीच्या तारखा निवडण्यासाठी उपलब्ध असतील.
• तुम्हाला सोयीची असलेली कोणतीही उपलब्ध तारीख निवडा आणि अपॉइंटमेंट निश्चित करा.

स्टेप 5: स्व-घोषणापत्र (Self-Declaration Document) डाउनलोड व अपलोड करा

• फॉर्ममध्ये खाली तुम्हाला ‘डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट’ चा पर्याय मिळेल. (तुम्ही त्याची प्रिंट डिस्क्रिप्शनमधूनही मिळवू शकता)
• हे स्व-घोषणापत्र (Self-Declaration) प्रिंट करून घ्या.
• माहिती भरा: यामध्ये तुमचे नाव, नोंदणी क्रमांक भरा. घोषणापत्र काळजीपूर्वक वाचा आणि खाली तुमची सही आणि अर्जदाराचे नाव लिहून ते पूर्ण करा.
• फोटो काढा: भरलेल्या घोषणापत्राचा फोटो (JPG) काढून घ्या.
• अपलोड करा: ‘चूझ फाईल’ (Choose File) वर क्लिक करून तयार केलेला फोटो अपलोड करा.
• फाईल यशस्वीरित्या (Successfully) अटॅच झाली की पुढे जा.

स्टेप 6: अपॉइंटमेंट प्रिंट काढा

• सर्व माहिती भरल्यावर आणि घोषणापत्र अपलोड झाल्यावर ‘प्रिंट अपॉइंटमेंट’ वर क्लिक करा.
• तुमची अपॉइंटमेंट स्लीप (पावती) तयार होईल. याची प्रिंट काढून घ्या.

3. भांडी घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची प्रक्रिया

तुम्हाला मिळालेल्या अपॉइंटमेंट स्लीपवर खालील महत्त्वाची माहिती दिलेली असेल:

ladki bahin yojana june installment date 2026
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा हप्ता जमा होणार, शासन निर्णय आला ladki bahin yojana june installment date 2026

• अपॉइंटमेंटची तारीख: जी तारीख तुम्ही निवडली आहे.
• शिबिराचे केंद्र (Camp Address): तुम्हाला ज्या पत्त्यावर जायचे आहे.
• किटचे तपशील: तुम्हाला 17 प्रकारांमधील एकूण 30 नग भांडी (गृह उपयोगी संच) भेटणार आहेत.

केंद्रावर गेल्यावर:

• तुम्ही निवडलेल्या तारखेला अपॉइंटमेंट स्लीप घेऊन केंद्रावर पोहोचा.
• तुमचे बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) घेतले जाईल.
• ऑनलाईन फोटो काढला जाईल.
• यानंतर तुम्हाला गृह उपयोगी संच (भांडी) वाटप केले जाईल.
• या पावतीवर कोणत्याही सही-शिक्क्याची गरज नाही.

➡️ लाडकी बहीण योजना E-KYC अंतिम तारीख जाहीर; शेवटची संधी लवकर केवायसी करा

Leave a Comment