Mini Tractor Anudan Yojana : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने Mini Tractor Anudan Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.
Mini Tractor Anudan Yojana योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे
● राज्यातील शेतकरी बचत गटांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे.
● 2017 च्या शासन निर्णयानुसार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादनक्षमतेत सुधारणा व्हावी आणि श्रम व वेळ वाचवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
अनुदानाची रचना
● एकूण खर्च 3,50,000 रुपये आहे.
● यासाठी शासनाकडून 3,15,000 अनुदान दिले जाईल. तर बचत गटाने केवळ 35,000 स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील.
● सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, त्यानंतर ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करता येतील.
Mini Tractor Anudan Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया
● योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून इच्छुकांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx
● अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
● अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी.
● पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
हे देखील वाचा : Farmer ID Card Download Process : मोबाइलवरुन शेतकरी ओळखपत्र 2 मिनिटांत करा डाऊनलोड
Mini Tractor Anudan Yojana eligibility पात्रता आणि अटी-शर्ती काय आहेत?
● अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
● अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
● बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
● गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
● अनुदानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीस परवानगी दिली जाईल.
● अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.