Milk Price Hike : वाढती महागाई आणि आर्थिक ताण यामुळे आता दुधाच्या किमती वाढणार आहेत. दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसेल. गाय आणि म्हैस यांचा दूध दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढणार आहे. पुण्यामधील कात्रज डेअरीमध्ये दूध उत्पादक संघाच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी दूध दरवाढी संबंधित मुद्दा मांडला गेला. यानुसार दूध किमतीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला.
15 मार्चपासून नवीन दर लागू
दूध दरवाढीस संबंधित प्रक्रिया 15 मार्चपासून लागू होईल. म्हणजे 15 मार्चपासून गाय आणि म्हैस यांचा दूध दर 2 रुपयांनी वाढणार आहे.
नवीन दर कसे असतील?
आता गायीच्या दुधाचा दर प्रति लिटर 56 रुपये आहे. तर म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 72 रुपयांचा आहे. आता या दरवाढीमुळे गाईच्या दुधाचा दर हा प्रति लिटर 58 रुपये होईल. तर म्हशीच्या दुधाचा दर हा प्रति लिटर 74 रुपयांचा होईल.
या बैठकीमध्ये दूध संकलन प्रक्रियेबाबतही विचार झाला. यानुसार दूध संकलन हे राज्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा करणे आवश्यक असल्याबाबत चर्चा झाली. तसेच दूध अनुदान योजने मधील 3-4 महिन्यांचे अनुदान हे अजून देखील प्रलंबित आहे. आणि हे शेतकऱ्यांना लवकर दिले जावे अशी मागणी देखील या सभेमध्ये मांडली गेली.
तसेच भेसळयुक्त पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करावी असा देखील मुद्दा दूध संघाकडून मांडला गेला. आणि शेतकऱ्यांचे जे प्रलंबित अनुदानाचे पेमेंट आहे ते लवकर पूर्ण करावे अशी मागणी दूध संघाने सरकारकडे केली आहे.