पोलिस भरती 2025: राज्यात 10,000 पदांसाठी मोठी भरती, अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखे पासुन सुरू! Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Recruitment 2025 Date – पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता राज्यात 10 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. 15 सप्टेंबर 2025 पासून ही भरती केली जाईल. गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होईल.

गणेशोत्सवानंतर पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होईल. साधारणपणे 15 सप्टेंबर नंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे. या वर्षी पोलिस भरतीमध्ये (Police Bharti 2025) एकूण 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती सुरु होणार आहे. 6 सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील आणि त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.

PM Kisan 22nd Installment Date 2026
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर; होळीपूर्वी खात्यात 4000 रुपये जमा होणार, पाहा मोठी अपडेट PM Kisan 22nd Installment Date 2026

या वर्षी 10 हजार पोलिस भरतीसाठी 12 ते 13 लाख इतके अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्या कारणामुळे सध्या पोलिस भरती घेतली जाऊ शकणार नाही. तसेच पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये पोलिस भरतीच्या 17 हजार जागांसाठी 17 लाख अर्ज आलेले होते. दरम्यान, आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिस भरतीचे निकष

● पोलिस भरतीसाठी एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचा आहे.
● जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येतील. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवले जाईल.
● जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केला म्हणून चाचणी देता येणार नाही.
● या भरतीसाठी 4 महिन्याचा कालावधी लागण्याची संभाव्यता आहे.

Ladki Bahin Yojana January Installment Date
लाडकी बहीण योजना: जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट Ladki Bahin Yojana January Installment Date

Leave a Comment