टाळाटाळ करू नका, 7/12 उताऱ्यात हे दोन शब्द नसतील तर जमीन होऊ शकते शासन जप्त Land Purchase Mistakes in 7/12

Land Purchase Mistakes in 7/12: जमीन खरेदी-विक्रीत सर्वात मोठी चूक — 7/12 उतारा न तपासणे:

दररोज हजारो लोक शेती व बिनशेती जमिनीचे व्यवहार करतात. पण बहुतेक खरेदीदार लोकेशन, कमी दर किंवा विक्रेत्याच्या बोलण्यावर अवलंबून राहतात आणि 7/12 उतारा तपासणे विसरतात, ही मोठी चूक ठरते. 7/12 उतारा हा जमीन व्यवहारातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
यात जमिनीची मालकी, हक्क, कायदेशीर बंधने, अटी याची स्पष्ट नोंद असते.

यातील दोन नोंदी —

1) ‘शर्त’
2) ‘धारणप्रकार’

या सातबाऱ्यावर नसल्यास जमीन व्यवहार अवैध ठरू शकतो आणि सरकार जमीन जप्त करू शकते. Land Purchase Mistakes in 7/12

जमिनीचे प्रकार कोणते? कोणती जमीन सुरक्षित?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार जमीन तीन प्रकारात विभागली जाते:

1) जुनी शर्त जमीन – वर्ग 1 (सुरक्षित जमीन)

• पूर्णपणे खासगी मालकी
• खरेदी-विक्रीसाठी सरकारी परवानगी लागत नाही
• 7/12 उताऱ्यावर “खा” असा उल्लेख
• ही जमीन खरेदीसाठी सर्वात सुरक्षित

2) नवी शर्त जमीन – वर्ग 2 (परवानगीशिवाय धोका)

• वतन, इनाम, पुनर्वसन, भूसंपादनातून मिळालेली जमीन
• व्यवहारासाठी तहसीलदाराची पूर्व लेखी परवानगी आवश्यक
• सातबाऱ्यावर “शर्त लागू”
• परवानगीशिवाय व्यवहार; जमीन सरकार जप्त करू शकते

LPG Subsidy Status Check
तुमच्या गॅसची सबसिडी खात्यात जमा झाली का? मोबाईलवर अशी तपासा ऑनलाइन प्रोसेस LPG Subsidy Status Check

3) राज्य पट्टेदार जमीन – (विक्री पूर्णपणे बेकायदेशीर)

• फक्त वापरासाठी दिलेली जमीन
• मालकी नसते
• विक्री किंवा हस्तांतरणावर संपूर्ण बंदी
• सरकार कधीही जमीन परत घेऊ शकते

7/12 उताऱ्यावर ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ आवश्यक का?

जर ही नोंद नसली तर;

• व्यवहारासाठी परवानगी आवश्यक आहे का ते समजत नाही
• परवानगीशिवाय व्यवहार केल्यास अवैध
• जमीन जप्त होऊ शकते
• नोंदणी कार्यालय व्यवहार नाकारणार
• शासनाचा नजराणा/दंड लागतो
• न्यायालयीन वाद वाढू शकतात

विशेषतः वर्ग–2 जमिनीत चुकीचा व्यवहार केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

जमीन खरेदीपूर्वी तपासायची Check-list

• 7/12 उताऱ्यावर “शर्त” व “धारणप्रकार” स्पष्ट आहेत का?

• जमीन वर्ग–1 की वर्ग–2?

• परवानगी लागू असल्यास आधीच लेखी परवानगी घ्या

• विक्रेत्याला जमीन कशी मिळाली याचा पुरावा पाहा

वकिलामार्फत कागदपत्रांची पडताळणी करा:

पोस्ट ऑफिस GDS पहिली निवड यादी जाहीर, अशी पहा यादी Post Office GDS 1st Merit List 2026
पोस्ट ऑफिस GDS पहिली निवड यादी जाहीर, अशी पहा यादी Post Office GDS 1st Merit List 2026

• जुने 7/12 उतारे

• फेरफार नोंदी

• मालकीची साखळी (Ownership Chain)

• जमीन नकाशा

• NA परवाना (लागल्यास)

जमिनीची अधिकृत माहिती कुठे मिळते?

• आपले सरकार सेवा केंद्र
• तहसील कार्यालय
• अधिकार अभिलेख (Record of Rights) कार्यालय
• जिल्हा निबंधक कार्यालय

➡️ तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे मोबाईलवरून पहा

Leave a Comment