लाडकी बहीण योजना, नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता 3000 रुपये? Ladki Bahin Yojana November- December 3000 Rupees Installment Update

Ladki Bahin Yojana November- December 3000 Rupees Installment Update: नोव्हेंबर महिना उलटून आता डिसेंबरचे 13 दिवस गेले आहेत. तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळाला नाही. लाभार्थी महिला या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. दरम्यान, येत्या 7 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

या दिवशी महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्र येऊ शकतात. पुढच्या 7 दिवसात म्हणजे 21 डिसेंबरआधी पैसे येण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान आहे. यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.

फक्त या लाडक्या बहि‍णींना मिळणार पैसे

लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी महिलांची तपासणी सुरु आहे. याअंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

केवायसीसाठी उरले शेवटचे 16 दिवस (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे 16 दिवस उरले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे त्याआधी सर्व महिलांनी केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर हे काम करावे, असं आवाहन आदिती तटकरेंनी केलं आहे.

e-Kyc करताना चूक झाली आहे? पुन्हा e-Kyc करण्यासाठी पर्याय उपलब्ध

जर आपण यापूर्वी ई-केवायसी पूर्णपणे बरोबर आणि अचूक केली असेल, तर पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ई-केवायसी करताना काही चूक झाल्याची शंका असल्यास किंवा माहिती चुकीची भरली गेली असेल, तर पुन्हा ई-केवायसी करण्याची मुभा देण्यात आली आहे. हा निर्णय 11 डिसेंबरच्या अधिकृत जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

कोणत्या महिलांनी पुन्हा ई-केवायसी करणे आवश्यक आहे

ज्या महिलांचे पती हयात नाहीत, ज्यांचे वडील हयात नाहीत, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केली नाही, तसेच ज्या महिलांची ई-केवायसी अर्धवट (हाफ केवायसी) राहिली आहे, अशा सर्व महिलांनी नव्याने ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच आधी केलेली ई-केवायसी चुकीची असल्यास ती दुरुस्त करण्यासाठीही ही संधी उपलब्ध आहे.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

➡️ लेक लाडकी योजना, लाभार्थ्यांच्या खात्यात येणार 5000 रुपये, जीआर आला

Leave a Comment