Ladki Bahin Yojana ekyc: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी करताना जर अडचणी येत असतील तर हा उपाय करा.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अडचणी
लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन पोर्टलवर जाऊन ई केवायसी करावी लागते. दरम्यान, ई केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ओटीपी देखील येत नाही. त्याचसोबत साइटवर लोड येत असल्याने केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत.
• लाभार्थी महिला एकाचवेळी केवायसीसाठी लॉग इन करायला गेल्यामुळे साइटवर लोड येतो. यामुळे एकाचवेळी अनेक महिलांची केवायसी होत नाही.
• लाभार्थ्यांनी केवायसी करताना घाई करू नका. अचूक माहिती भरा. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन केवायसी पुर्ण करा.
उपाय काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ई केवायसी करताना अनेक लाभार्थी एकाचवेळी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे साइटवर लोड येतो. अशावेळी रात्री 12नंतर किंवा पहाटे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान ई केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात तुमची केवायसी प्रोसेस जलद होऊ शकते.
➡️ लाडकी बहीण योजनेची eKYC अशी करा; संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप