Ladki Bahin Yojana e-KYC: राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 चा थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
पण आता अनेक लाभार्थींना एकच प्रश्न पडला आहे — “पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे का?”
पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे का?
योजनेत पारदर्शकता यावी, फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ घेता यावा, अपात्र लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर या योजनेतुन बाहेर करणे सोपे व्हावे यासाठी ई-केवायसी सुरु केली आहे. यासाठी सर्वांनी केवायसीची प्रक्रिया पुर्ण करून आपला लाभ नियमित सुरु ठेवावा. अन्यथा पात्र असून देखील तुमचे पुढील हप्ते थांबू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पुर्ण करा.
ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख – वेबसाईट समस्या
सरकारने ठरवलेली ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर पर्यंत आहे. परंतु लाभार्थिंना येत असलेल्या तांत्रिक समस्यांमुळे अनेक लाभार्थिंची केवायसी अद्याप पुर्ण झालेली नाही. सर्व्हर संबंधित समस्या, OTP समस्या टाळण्यासाठी रात्री 11:00 ते सकाळी 5:00 या वेळेत तुम्ही आपली केवायसी पुर्ण करा. लक्षात ठेवा, ई-केवायसी पूर्ण न केल्यास ₹1500 चा पुढील हप्ता थांबू शकतो.
Ladki Bahin Yojana e-KYC
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया काही मिनिटांत ऑनलाइन पूर्ण होते. सरकारकडून मिळणारा लाभ अखंडपणे मिळावा म्हणून आजच ई-केवायसी पूर्ण करा!
➡️ लाडकी बहीण योजना: E-KYC करण्याची नवीन प्रक्रिया, अवघ्या 2 मिनिटांत करा
