माझी लाडकी बहीण; डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, स्टेटस चेक करा Ladki Bahin Yojana December Hafta

Ladki Bahin Yojana December Hafta: राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीच्या सणापूर्वी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. अनेक महिलांना याचे एसएमएस प्राप्त झाले असून ही एक मोठी दिलासादायक अपडेट मानली जात आहे.

​काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून अशा चर्चा सुरू होत्या की मकर संक्रांतीपूर्वी महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आज सकाळी 10 वाजेपासून अनेक पात्र भगिनींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांचे आधार लिंकिंग पूर्ण आहे, अशा महिलांना या लाभाचे वितरण प्राधान्याने केले जात आहे.

निवडणूक आयोगाची परवानगी आणि हप्ता वितरणाची स्थिती

​यापूर्वी अशी चर्चा होती की महिलांच्या खात्यात 3000 रुपये (दोन महिन्यांचे हप्ते) जमा होतील. परंतु, सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक विभागाकडून केवळ डिसेंबर महिन्याचा एकच हप्ता वितरीत करण्याची तांत्रिक परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या केवळ 1500 रुपयेच महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

​ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. ही रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जात असल्याने आज संध्याकाळपर्यंत किंवा येत्या एक ते दोन दिवसांत उर्वरित सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात हे पैसे निश्चितपणे जमा होतील.

पैसे मिळाले नसल्यास काय करावे?

​जर तुम्हाला अजूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर खालील गोष्टी तपासून पाहणे आवश्यक आहे:

• ​आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeding) आहे की नाही याची खात्री करा.
• ​योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती ‘पात्र’ (Approved) असल्याची खात्री करा.
• ​तुमचे बँक खाते सक्रिय असल्याचे तपासा.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

➡️ सोलर पंप योजना; नवी लाभार्थी यादी मोबाईलवर अशी डाउनलोड करा

Leave a Comment