Ladki Bahin Yojana – लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकार जमा करते. आता एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana April Month Installment)
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरित केले आहेत. आता महिला 10व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत जमा होईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत गेल्या 3-4 महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या आठवड्यात जमा होऊ शकतात.
एप्रिलचा हप्ता लांबणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलचा लाभ लांबण्याची देखील शक्यता आहे. आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता लांबणार आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
9 लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. या योजनेत तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद झाले आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. ही संख्या अजून वाढण्याची देखील शक्यता आहे.