लाडकी बहीण योजना eKYC मुदत वाढली; आता या तारखेपर्यंत करा KYC Ladki Bahin e-KYC last date

Ladki Bahin e-KYC last date: महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवत आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

सरकारने यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत e-KYC अनिवार्य केले होते. मात्र अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे हजारो महिलांना वेळेत ही प्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे सरकारने मोठा दिलासा देत e-KYC ची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.

e-KYC अंतिम तारीख वाढवली – महिलांसाठी मोठा दिलासा

नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक समस्या आणि मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे लाभार्थ्यांचे e-KYC वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेचा लाभ खंडित होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पती/वडील हयात नसल्यास पर्याय काय?

पती किंवा वडिलांचे निधन किंवा घटस्फोट झालेल्या महिलांना OTP चा प्रश्न निर्माण झाला होता.

• अशा लाभार्थ्यांसाठी नवीन पर्याय: महिलांनी खालील कागदपत्रांची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे:

• पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
• घटस्फोटाचे अधिकृत प्रमाणपत्र
• न्यायालयाचा आदेश

या दस्तऐवजांच्या आधारे e-KYC प्रक्रिया पूर्ण मानली जाईल आणि लाभ खंडित होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

OTP येत नाही?

मोठ्या प्रमाणात महिला एकाच वेळी e-KYC करत असल्याने अधिकृत पोर्टलवर प्रचंड ताण येतो यामुळे OTP उशिरा येतो, वेबसाइट मंद चालते, कधी कधी साइट क्रॅश होते. यासाठी उपाय कमी लोडच्या वेळेत e-KYC करा

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

सरकारचा सल्ला:

रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत e-KYC करा, या वेळेत सर्व्हर लोड कमी असल्याने प्रक्रिया जलद होते. आता e-KYC साठी दोन महिन्यांचा पुरेसा अवधीही देण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana online KYC – अशी करा e-KYC

1️⃣ वेबसाइट उघडा: https://ladakibahin.maharashtra.gov.in

2️⃣ मुख्य पृष्ठावर ‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करा.

3️⃣ आधार क्रमांक + कॅप्चा भरा भरून ‘Send OTP’ वर क्लिक करा

4️⃣ आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका ‘Submit’ करा

5️⃣ सिस्टम तपासेल की तुमचे e-KYC आधी झाले आहे का.

6️⃣ पती/वडिलांचा आधार क्रमांक भरा, त्यांच्याही मोबाईलवर OTP येईल (पडताळणी करा)

7️⃣ जात प्रवर्ग निवडा आणि खालील घोषणा करा:

ladki bahin yojana june installment date 2026
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा हप्ता जमा होणार, शासन निर्णय आला ladki bahin yojana june installment date 2026

• कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी/निवृत्तीवेतनधारक नाही
• कुटुंबातील फक्त 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला लाभ घेते

8️⃣ चेकबॉक्स निवडा ‘Submit’ वर क्लिक करा

9️⃣ ‘e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण झाले’ असा संदेश दिसेल

Ladki Bahin  e-KYC last date

‘माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी मोठा आधार आहे. सरकारने e-KYC ची तारीख वाढवल्यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत e-KYC पूर्ण केल्यास ₹1500 चा मासिक लाभ थेट खात्यावर मिळत राहील.

➡️ आधार नंबर टाकून चेक करा EKYC झाली का, फक्त दोनच मिनिटात

Leave a Comment