उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितली सोपी ट्रिक

Injected vs Natural WaterMelon – उन्हाळा सुरु झाला की आपण रसाळ आणि पाण्याचा अंश असलेल्या फळांचे सेवन करतो, जसे की कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचा अंश अधिक असतो, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी हे उत्तम फळ आहे. पण आजकाल बाजारामध्ये प्रत्येक गोष्टीत भेसळ किंवा फसवणूक करतात त्यामुळे आपण अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

अनेक फळांना पिकवण्यासाठी औषध आणि इंजेक्शन वापरले जाते. आज-काल बाजारामध्ये अशी कलिंगड विकली जात आहेत. ज्यांना इंजेक्शन देऊन पिकवले जाते किंवा लाल दिसण्यासाठी इंजेक्शन देऊन रंगवले जाते. दरम्यान चुकूनही अशा फळांचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये करायचे तरी काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. चिंता करू नका, इंजेक्शन दिलेले कलिंगड ओळखण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे वापरून तुम्हाला सावध राहता येईल.

बाजारातून कलिंगड आणून खाण्याचा तुमचा बेत असेल तर थोडं थांबा. कलिंगड खाण्याआधी त्याची सोप्या पद्धतीने तपासणी करा आणि खात्री झाल्यानंतरच ते खा. कलिंगडला कृत्रिम रंगाचे इंजेक्शन दिले आहे किंवा नाही हे ओळखणे सोपे आहे.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे?

प्रथम कलिंगड कापा. एक ग्लास पाणी घ्या. आता कलिंगडचा एक तुकडा कापा आणि त्या ग्लासमधील पाण्यात टाका. जर पाण्याचा रंग बदलला नाही तर कलिंगड खाण्यासाठी योग्य आहे असे समजा. आणि जर पाण्याला लालसर रंग आला तर कलिंगड खाण्यासाठी योग्य नाही असे समजा. अशा कलिंगडला इंजेक्शन दिलेले असू शकते. त्यामुळे असे कलिंगड खाणे टाळा.

व्हिडिओ पहा – येथे क्लिक करा

इंस्टाग्रामवर chanda_and_family_vlogs नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला कलिंगड कापते आणि त्याचा तुकडा पाण्यामध्ये टाकते. त्यानंतर पाण्याला हलकासा लालसर रंग आल्याचे दिसते. म्हणजेच कलिंगडला इंजेक्शन देण्यात आल्याचे पहायला मिळते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. बाजारामधून आणलेले कलिंगड खाण्याआधी एकदा त्याची तपासणी नक्की करा.

Marginal Farmer Certificate
Marginal Farmer Certificate: तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ नक्की काढा – जाणून घ्या फायदे!

कलिंगड खाण्याचे फायदे

कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक आणि पित्तनाशक आहे. कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात अधिक असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर त्यावेळी कलिंगड खाल्ल्यास जास्त फायदा होतो. कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होते. उष्माघातामुळे शरीराची आग होत असल्यास किंवा उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असल्यास कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवा. थोडयाच वेळात शरीराची आग कमी व्हायला मदत होईल.

Leave a Comment