होम लोन घेताना लागणारे महत्त्वाचे चार्जेस, जाणून घ्या Home Loan Hidden Charges

Home Loan Hidden Charges: स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आजच्या महागाईच्या काळात घर खरेदीसाठी बहुतेकांना होम लोन घ्यावे लागते. मात्र, लोन घेताना केवळ व्याजदरच नाही तर काही अतिरिक्त चार्जेस देखील भरावे लागतात. चला हे चार्जेस समजून घेऊया.

1. ॲप्लिकेशन फीस

होम लोनसाठी अर्ज करताना ही फी आकारली जाते.
ही फी परत न मिळणारी (non-refundable) असते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँक किंवा NBFC नीट निवडा.

2. कमिटमेंट फीस

लोन मंजूर झाल्यानंतर ठराविक वेळेत कर्ज न घेतल्यास काही बँका कमिटमेंट फीस आकारतात. हे शुल्क वितरित न केलेल्या कर्जावर लागू होते.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

3. लिगल फीस

मालमत्तेची कायदेशीर पडताळणी करण्यासाठी वकीलांची फी बँक ग्राहकाकडून घेते. जर प्रकल्प आधीच मंजूर असेल तर हे शुल्क टाळता येऊ शकते.

4. मॉर्गिज डीड फीस

ही फी कर्जाच्या रकमेच्या टक्केवारीवर आधारित असते आणि हा मोठा खर्च ठरू शकतो. काही बँका ऑफर म्हणून ही फी माफही करतात.

5. प्रीपेमेंट पेनल्टी

कर्जाची रक्कम आधी भरल्यास बँक काही वेळा प्रीपेमेंट दंड आकारते. आरबीआयनुसार फ्लोटिंग व्याजदराच्या कर्जांवर हा दंड लागू नाही, पण फिक्स्ड रेट लोनसाठी 2% पर्यंत आकारला जाऊ शकतो.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

Home Loan Hidden Charges

होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहून निर्णय घेऊ नका. वरील चार्जेसची पूर्ण माहिती घेऊनच कर्ज घ्या, म्हणजे पुढील आर्थिक ताण टाळता येईल.

➡️ पर्सनल लोन घेण्यासाठी ‘ही’ सरकारी बँक सर्वोत्तम – फक्त 9% व्याजदर

Leave a Comment