Government loan schemes for rural entrepreneurs: सरकारी मदतीने गावात सुरू करा उद्योग, 2 लाख तारणमुक्त कर्ज आणि 35% अनुदानाची संधी

Government loan schemes for rural entrepreneurs: आजच्या तरुणाईकडे ऊर्जा, जिद्द आणि कौशल्य आहे, पण संधीची कमतरता आहे. अनेक जण चांगल्या नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात, पण तिथे स्पर्धा आणि खर्च खूप असल्याने स्वप्ने अपुरी राहतात. मात्र, आता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि केंद्र शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून तुमच्या गावातच तुमचं भविष्य घडवण्याची संधी आली आहे

या योजनांचा उद्देश फक्त रोजगार उपलब्ध करून देणे नाही, तर तुमच्यासारख्या तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास सक्षम करणे आहे. पारंपरिक कौशल्य, हस्तकला, उत्पादन किंवा सेवा उद्योग अशा वेगवेगळ्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला प्रगतीची वाट खुली आहे

Government loan schemes for rural entrepreneurs

1. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP)

ही योजना देशभर राबवली जाते आणि उत्पादन व सेवा उद्योगांना चालना देते

यात काय मिळेल? (PMEGP loan scheme details)

• उत्पादन उद्योगासाठी कर्ज : 50 लाखांपर्यंत
• सेवा उद्योगासाठी कर्ज : 20 लाखांपर्यंत
• भांडवली सहभाग : सामान्य गट – 10%, विशेष गट – 5%
• दुबार कर्ज प्रकल्प : कार्यरत युनिटचा विस्तार करण्यासाठी सुमारे 1 कोटीपर्यंत कर्ज व अनुदान
• पात्रता : किमान 8वी उत्तीर्ण, वय 18 वर्षांवरील व्यक्ति

ही योजना नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी उत्तम आहे, मग तो अन्नप्रक्रिया उद्योग असो, उत्पादन युनिट असो किंवा सेवा केंद्र असो

2. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)

राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना 1 लाख लघुउद्योग स्थापन करून 10 लाख रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय ठेवते

agricultural loan details in marathi
कृषी कर्ज कसे मिळवावे? शेती कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि सरकारी योजनांची संपूर्ण माहिती (2026) agricultural loan details in marathi

मुख्य वैशिष्ट्ये (CMEGP subsidy for small business)

• वयोगट : 18 ते 45 वर्षे
• उत्पादन क्षेत्रासाठी कर्ज : 50 लाखांपर्यंत
• सेवा क्षेत्रासाठी कर्ज : 20 लाखांपर्यंत
• अनुदान : 15% ते 35% पर्यंत (क्षेत्र व गटानुसार)

ही योजना विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण युवक-युवतींसाठी उत्तम आहे

3. मध केंद्र योजना (Beekeeping subsidy scheme)

मध उत्पादन हा नफा देणारा आणि पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील गोष्टि दिल्या जातात

• 50% अनुदानावर मध उत्पादनासाठी आवश्यक साहित्य
• प्रशिक्षणाची सोय
• हमी दराने मध खरेदीची व्यवस्था

ही योजना मधपाळांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा आणि व्यवसायाचा मजबूत पर्याय आहे

4. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

पारंपरिक कौशल्य जपणाऱ्या कारागीरांसाठी ही योजना खास आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील गोष्टि दिल्या जातात (Vishwakarma Yojana benefits)

Maharashtra Rain Update
24 ते 28 जून दरम्यान राज्यात तुफान पाऊस! अतिवृष्टीमुळे धरणे भरणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Maharashtra Rain Update

• मोफत कौशल्य प्रशिक्षण
• 15,000 किमतीचे टूलकिट
• 2 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज
• इतर विविध लाभ

सुतार, लोहार, कुंभार, सोनार, विणकर अशा पारंपरिक व्यवसायांना आधुनिक साधनसामग्री व वित्तीय मदत मिळते

शाश्वत ग्रामविकासाची दिशा

या सर्व योजनांमुळे ग्रामीण भागातील युवकांना फक्त रोजगारच मिळत नाही, तर स्वतःचा व्यवसाय उभारण्याची ताकद मिळते. गावातच उद्योग सुरू केल्यामुळे शहरांत स्थलांतराची गरज कमी होते, पारंपरिक व्यवसाय टिकून राहतात, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा जोम मिळतो

अधिक माहितीसाठी

तुमच्या जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा. तिथे तुम्हाला अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाची टक्केवारी आणि कर्ज मिळण्याची अट याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल

➡️ पंतप्रधान मुद्रा योजनेतुन कसे घ्याल 10 लाखांपर्यंतचे कर्ज?

Leave a Comment