Goverment Loan Schemes: महिला उद्योजिकांना ‘या’ विशेष सरकारी योजना देतात बिनव्याजी 10 लाखापर्यंतचे कर्ज

Goverment Loan Schemes: आजच्या काळात महिला फक्त घर आणि संसारापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्या स्वतःच्या पायावर उभं राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचं स्वप्न पाहतात. अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशा महिलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही खास योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमधून महिलांना कमी व्याजदरात किंवा बिनव्याजी कर्ज मिळतं, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होते.

1. स्टँड अप इंडिया योजना

ही योजना एससी आणि एसटी प्रवर्गातील महिला उद्योजिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

• कर्ज मर्यादा: ₹10 लाख ते ₹1 कोटीपर्यंत
• पात्रता: कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसणे आवश्यक
• व्यवसाय प्रकार: मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस किंवा कृषी संबंधित
• या योजनेत व्याजदर इतर योजनांपेक्षा कमी असून, महिला उद्योजिकांना विशेष प्रोत्साहन दिलं जातं.

2. स्त्री शक्ती योजना

या योजनेत महिलांना साबण, डिटर्जंट, दुग्ध व्यवसाय, पापड निर्मिती, कपडे उत्पादन, ब्युटी पार्लर इत्यादी व्यवसायांसाठी कर्ज दिलं जातं.

जीडीएस भरती 2026
जीडीएस भरती 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पासवर 28,000+ जागा, असा करा ऑनलाइन अर्ज!

• कर्ज मर्यादा: ₹25 लाखांपर्यंत
• भागीदारी अट: व्यवसायात महिलांची 50% किंवा त्याहून अधिक भागीदारी आवश्यक
• गॅरंटी: ₹50,000 पर्यंत कर्जासाठी गॅरंटी आवश्यक नाही, परंतु ₹5 लाख ते ₹25 लाख कर्जासाठी काहीतरी तारण द्यावं लागतं.

3. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट (CGTMSE)

एमएसएमई मंत्रालय आणि सिडबीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत आधीच व्यवसाय सुरू केलेल्या महिला उद्योजिकांना मदत केली जाते.

• उद्देश: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्य
• कर्ज मर्यादा: पूर्वी ₹2 कोटी होती, आता ती ₹5 कोटी रुपयांपर्यंत वाढवली गेली आहे.
• या योजनेत कर्जावर सरकारकडून गॅरंटी दिली जाते, ज्यामुळे बँकांना कर्ज मंजूर करणे सुलभ होते.

4. पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY)

महिला उद्योजिकांसाठी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे.

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

• कर्ज मर्यादा: ₹10 लाखांपर्यंत
• श्रेणी:
1. शिशू योजना – ₹50,000 पर्यंत (नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी)
2. किशोर योजना – ₹5 लाखांपर्यंत
3. तरुण योजना – ₹10 लाखांपर्यंत
• वैशिष्ट्ये: तारणमुक्त कर्ज, व्याजदरात सवलत आणि 5 वर्षांचा परतफेड कालावधी

Goverment Loan Schemes

सरकारच्या या सर्व योजना महिला उद्योजिकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहेत. ग्रामीण किंवा शहरी कुठल्याही भागातील महिला या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. योग्य मार्गदर्शन आणि थोड्या धैर्याने, प्रत्येक महिला “उद्योजिका” बनू शकते!

➡️ पंतप्रधान मुद्रा योजनेतुन कसे घ्याल 10 लाखांपर्यंतचे कर्ज?

Leave a Comment