Fixed Deposit Rates : जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो त्यावेळी बहुतेक करून आपण FD (Fixed Deposit) ला प्राधान्य देतो, कारण हा पर्याय इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सुरक्षित आहे. आणि तो फिक्स रिटर्न देखील देतो. देशामध्ये असणाऱ्या अनेक मोठ्या सरकारी आणि प्रायव्हेट बँका FD च्या व्याजदरांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात. जर तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणती बँक FD वर सर्वाधिक व्याज देत आहे ते आपण येथे पाहूया. Fixed Deposit Rates
FD गुंतवणूक का फायदेशीर आहे? Benefits of Fixed Deposit
तुम्ही गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, आणि कमी जोखीम आणि चांगला परतावा हवा असेल तर आजच्या काळात FD हा चांगला पर्याय आहे.
• FD चे व्याजदर हे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असतात.
• ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका FD व्याजदर वेळोवेळी बदलत असतात.
• यामध्ये सामान्य ग्राहकांना वरिष्ठ ग्राहकांच्या तुलनेत कमी व्याज मिळते.
• FD मध्ये गुंतवणूक करताना ठराविक कालावधीसाठी काही ठराविक रक्कम जमा केली जाते.
STATE BANK OF INDIA (SBI) Fixed Deposit Rates
• अमृत वृष्टी FD या स्कीम अंतर्गत SBI, 444 दिवसांसाठी आपल्या ग्राहकांना 7.25% व्याज देत आहे.
• 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष FD साठी व्याजदर हे अनुक्रमे 6.80%, 6.75% आणि 6.50% आहेत.
• 1 वर्षासाठी तुम्ही जर 5 लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर रक्कम ₹5,34,877 इतकी मिळेल.
• 3 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक केल्यास ₹6,15,720 आणि 5 वर्षांसाठी ती ₹7,07,389 इतकी मिळेल.
PANJAB NATIONAL BANK (PNB) Fixed Deposit Rates
400 दिवसांच्या FD वर पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 7.25% इतके व्याज देत आहे.
• यामध्ये 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष FD साठी तुम्हाला व्याजदर अनुक्रमे 6.80%, 7% आणि 6.50% आहे.
• यामध्ये 1 वर्षासाठी तुम्ही 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर ₹5,34,877 इतकी रक्कम मिळेल.
• तर 3 वर्षांसाठी ती ₹6,15,720 इतकी आणि 5 वर्षांसाठी ₹6,90,210 इतकी मिळेल.
CANARA BANK Fixed Deposit Rates
444 दिवसांच्या FD वर कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना 7.25% व्याज देत आहे.
• 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष FD साठी व्याजदर अनुक्रमे 6.85%, 6.80% आणि 6.70% इतका आहे.
• तुम्ही यामध्ये 1 वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर ₹5,35,140 इतकी रक्कम मिळेल.
• 3 वर्षांसाठी ₹6,12,099 इतकी आणि 5 वर्षासाठी ती ₹6,97,033 इतकी मिळेल, म्हणजे तुम्हाला ₹97,033 अतिरिक्त मिळू शकतात.
BANK OF BARODA (BOB) Fixed Deposit Rates
400 दिवसांच्या FD वर बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 7.30% व्याज देत आहे.
• 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष FD साठी व्याजदर अनुक्रमे 6.85% 7.15% आणि 6.80% आहे.
• यामध्ये 1 वर्षासाठी तुम्ही 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर ₹5,35,140 इतकी रक्कम मिळेल.
• 3 वर्षांसाठी ती ₹6,18,448 इतकी आणि 5 वर्षांसाठी ती ₹7,00,469 इतकी मिळेल.
HDFC BANK Fixed Deposit Rates
4 वर्षे 7 महिने म्हणजे 55 महिन्यांच्या FD वर HDFC बँक आपल्या सामान्य आणि वरिष्ठ ग्राहकांना 7.40% व्याज देत आहे.
• 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष FD साठी व्याजदर अनुक्रमे 6.60%, 7% आणि 7% आहे.
• यामध्ये 1 वर्षासाठी तुम्ही 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर ₹5,33,826 इतकी रक्कम मिळेल.
• 3 वर्षांसाठी ₹6,15,720 इतकी आणि 5 वर्षांसाठी ₹7,07,389 इतकी रक्कम मिळेल.
ICICI BANK Fixed Deposit Rates
15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर ICICI बँक आपल्या ग्राहकांना 7.25% व्याज देत आहे.
• 1 वर्ष, 3 वर्षे आणि 5 वर्षे FD साठी व्याजदर अनुक्रमे 6.70%, 7% आणि 7% आहे.
• यामध्ये 1 वर्षासाठी तुम्ही 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला ₹5,33,826 इतकी रक्कम मिळेल
• 3 वर्षासाठी ती ₹6,15,720 इतकी तर 5 वर्षांसाठी ₹7,07,389 इतकी रक्कम मिळेल.
जर तुम्ही फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचारत असाल तर यासाठी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर (Fixed Deposit Rates) पहा आणि त्यामधून सर्वोत्तम पर्याय निवडा. हे तुमच्यासाठी फायदेशीर होईल FD हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी हा पर्याय सर्वोत्तम मानला जातो.
