Farmer ID Card Download Process : मोबाइलवरुन शेतकरी ओळखपत्र 2 मिनिटांत करा डाऊनलोड

Farmer ID Card Download Process : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी (Farmer ID Card) नोंदणी केली असून, त्यांना आता युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता हा आयडी कसा डाउनलोड करायचा, याबाबत उत्सुक आहेत. चला तर मग, या प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अग्रिस्टॅक (Agristack Scheme) योजनेअंतर्गत फार्मर आयडी सुरू केला आहे. या माध्यमातून शेतजमिनीची माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, डिजिटलायझेशन, जमीन मालकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

Farmer ID Card Download Process – फार्मर आयडी कसा डाउनलोड कराल?

फार्मर आयडी डाउनलोड करण्यासाठी खालील सोपी प्रक्रिया पूर्ण करावी.

Gharkul Yojana 2025 list
2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list

●सर्वप्रथम https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत वेबसाईटवर जा.
● जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल,तर आधार क्रमांक टाका.
● नंतर तुमच्या नोंदणीची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
● आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर तुमचा युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल.
● सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही, त्यामुळे तुम्ही आधी दिलेली माहितीच दाखवली जाईल.

पीडीएफ कशी डाऊनलोड करायची?

● पोर्टल मध्ये ‘View Details’ या पर्यायावर क्लिक करा.
● तिथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल.
● वरील बाजूस ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ हा पर्याय दिसेल.
● ‘Download PDF’ क्लिक करून फार्मर आयडी डाउनलोड करून प्रिंट काढा.

कार्ड वितरण आणि पुढील प्रक्रिया कशी असणार?

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री यांच्या हस्ते हे कार्ड अधिकृतरित्या वितरित केले जाईल. शेतकऱ्यांना पोस्टाने देखील हे कार्ड मिळेल, तसेच इच्छुक शेतकरी Agristack च्या संकेतस्थळावरून स्वतः देखील कार्ड डाउनलोड करू शकतील.

PMAY application rejected reason
PMAY application rejected reason: घरकूल योजनेसाठी अर्ज केला होता पण नाव यादीत नाही? जाणून घ्या यामागील कारणे

हे देखील वाचा : PAN and Aadhaar Card After Death – मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Leave a Comment