CMEGP scheme Maharashtra: आजच्या तरुण पिढीला नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अधिक आहे. मात्र, भांडवलाची अडचण ही त्यांच्या मार्गात मोठा अडथळा ठरते. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP Scheme)’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे शासनाच्या आर्थिक पाठबळाने स्वतःचा व्यवसाय उभारण्याची एक उत्तम संधी आहे.
CMEGP MSME loan scheme
या योजनेअंतर्गत तुम्ही जर 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त 7 लाख रुपये परत करावे लागतील, कारण उर्वरित रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. हा निधी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो. ही योजना उद्योग संचालनालयामार्फत राबवली जाते आणि ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार, सुशिक्षित युवक-युवतींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
योजनेअंतर्गत मंजूर होणारे प्रकल्प (Approved Projects under CMEGP Scheme)
• उत्पादन/प्रक्रिया उद्योग – 50 लाखांपर्यंत कर्ज
• सेवा उद्योग – 20 लाखांपर्यंत कर्ज
अनुदान किती मिळेल?
प्रवर्ग | ग्रामीण भाग | शहरी भाग |
सर्वसाधारण | 25% | 15% |
अनुसूचित जाती/जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक | 35% | 25% |
स्वतःची गुंतवणूक:
• ग्रामीण भागात: किमान 5%
• शहरी भागात: किमान 10%
कोण पात्र आहे? (CMEGP Scheme Eligibility Criteria)
वयाची अट:
• सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 18 ते 45 वर्षे
• SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक: 18 ते 50 वर्षे
शिक्षण:
• 10 लाखांपर्यंत प्रकल्पासाठी: किमान 7वी पास
• 25 लाखांहून अधिक प्रकल्पासाठी: किमान 10वी पास
• अर्जदाराने याआधी कोणत्याही शासकीय अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कोणते व्यवसाय सुरू करता येतील?
उत्पादन उद्योग (50 लाखांपर्यंत):
• बेकरी व खाद्यपदार्थ उत्पादन
• पशुखाद्य उत्पादन
• चप्पल-बूट तयार करणे
• वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन युनिट
सेवा उद्योग (20 लाखांपर्यंत):
• सलून / ब्यूटी पार्लर
• इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग सेंटर
• मोबाइल/मोटारसायकल रिपेअरिंग
अर्ज कसा करावा? (How to Apply for CMEGP Scheme)
• या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो.
• अधिकृत वेबसाईट: https://maha-cmegp.gov.in
• वेबसाईटवर लॉगिन करून, तुमची माहिती भरून अर्ज सादर करा.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे (Documents Required for CMEGP Application)
• पासपोर्ट साईझ फोटो
• आधार कार्ड
• अधिवास प्रमाणपत्र
• जन्म प्रमाणपत्र
• शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र
• जातीचा दाखला (लागू असल्यास)
• पॅन कार्ड
• व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल
CMEGP scheme Maharashtra
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही योजना केवळ कर्ज मिळवण्यासाठी नसून स्वतंत्र व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी एक चांगली संधी आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास, अल्प भांडवली गुंतवणुकीतूनही तुम्ही तुमचा स्वप्नातील व्यवसाय सुरू करू शकता. स्वतःचा व्यवसाय म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन नाही, तर आर्थिक स्वातंत्र्याची आणि सन्मानाची सुरुवात आहे.