Aadhar card Update Limit : आधार कार्ड हे भारतामध्ये वापरले जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये आवश्यक कागदपत्र आहे. भारतामधील जवळपास 90% लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. विविध बँका, शाळा महाविद्यालय तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बऱ्याचवेळा आधार कार्ड बनवत असताना आपल्याकडून काही चुकीची माहिती त्यामध्ये नोंदवली जाते आणि या चुकीच्या माहितीमुळे भविष्यामध्ये आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागते.
आधार कार्ड बनवत असताना त्यामध्ये चुकीची माहिती नोंदवली गेली असल्यास आधार कार्ड चालवणारी UIDAI ही संस्था लोकांना आपल्या आधार कार्डमधील चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी संधी देते. तसेच अनेकदा कालबाह्य झालेली माहिती तुम्हाला अपडेट करावी लागत असते. आधार कार्ड मधील माहिती अपडेट करण्यासाठी मर्यादा दिल्या आहेत, परंतु काही माहिती अपडेट करण्याला मर्यादा नाही त्याबद्दल या ठिकाणी सविस्तर पाहूया.
घराचा पत्ता – Aadhar card Update Limit
आधार कार्ड मधील माहितीच्या बदलासाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, परंतु घराच्या पत्त्यासाठी (Home Address) कोणतीही मर्यादा निश्चित नाही. अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात त्यांना काही काळानंतर आपलं घर बदलावे लागते. अशावेळी त्यांना आपल्या घराचा पत्ता देखील बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळा पण तुमची घरं बदलता तेव्हा तेव्हा तुम्ही आधार कार्ड मधील पत्ता बदलू शकता. आधार कार्ड मधील पत्ता बदलण्याबाबत यूआयडीएआय या संस्थेने कोणतेही बंधन घातलेले नाही.
आधार लिंक मोबाईल नंबर – Aadhar card Update Limit
पत्त्याव्यतिरिक्त आधार कार्ड मधील आणखी एक माहिती आहे ती तुम्ही हव्या तितक्या वेळा बदलू शकता ती म्हणजे तुमच्या आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरमुळे तुम्हाला आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नसते. ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही तुमची आवश्यक कामे करू शकता. तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बंद असल्यास तो लगेच बदला. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्यास युआयडीएआय या संस्थेने कोणतीही मर्यादा घातलेली नाही.
आधार अपडेट करणे आवश्यक आहे का?
आधार कार्डला कोणतीही वैधता नसते. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार आधार कार्डला कोणतीही एक्सपायरी डेट नाही ते तुम्हाला आयुष्यभरासाठी वैद्य राहील. ठराविक वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधार कार्ड हे वारंवार अपडेट करण्याची आवश्यक्ता देखील नाही.
हे देखील वाचा : PAN and Aadhaar Card After Death – मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
एखाद्या व्यक्तीने 10 वर्षानंतर आपले आधार कार्ड अपडेट केले नाही तरी ते वैद्य राहू शकते. मात्र भविष्यामध्ये गैरसोय टाळण्यासाठी आपल्याला ते अपडेट करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधार अपडेट करण्याची प्रक्रिया तुम्ही कोणत्याही आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन पूर्ण करू शकता.