Home Loan Or Rent House: प्रत्येक व्यक्तीचं एक मोठं स्वप्न असतं – स्वतःचं घर असावं. आजकालच्या काळात बँका सहजपणे लाखो रुपयांचे कर्ज देतात आणि या स्वप्नाला साकार करतात. पण हेच कर्ज अनेक वेळा मोठा आर्थिक ताण निर्माण करु शकतं. त्यामुळे काही लोक अजूनही भाड्याच्या घरात राहणंच योग्य मानतात. मग, कर्ज काढून घर घेणं फायद्याचं आहे का? की भाड्याने राहणं योग्य आहे? चला याचा सविस्तर अभ्यास करूया.
फक्त आधार कार्डवर मिळवा 5 लाखांचे SBI पर्सनल लोन, येथे ऑनलाइन अर्ज करा
ईएमआय आणि घरभाड्याची तुलना Home Loan Or Rent House
घर घेण्यासाठी घेतलेल्या कर्जावर तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम म्हणजेच ईएमआय (EMI) भरावा लागतो. अनेकजण विचार करतात की जर घरभाडे आणि ईएमआय जवळपास सारखेच असेल, तर स्वतःचं घर घेऊन ईएमआय भरणं चांगलं. पण नेहमीच भाडे आणि ईएमआयची सरळ तुलना योग्य नाही. घरभाडे भविष्यात वाढू शकते, मात्र कर्जाची ईएमआय निश्चित असते.
फक्त आधार कार्डवर मिळवा 5 लाखांचे SBI पर्सनल लोन, येथे ऑनलाइन अर्ज करा
कर्ज घेऊन घर घेतल्यास होणारे फायदे आणि तोटे
फायदे:
• भविष्यात घराचे भाडे वाढत राहते, पण तुमचा ईएमआय कायम राहतो.
• स्वतःच्या मालकीचं घर असल्याने स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना मिळते.
तोटे:
• कर्ज घेतल्यावर 20-25 वर्षे ईएमआयचा आर्थिक भार सहन करावा लागतो.
• एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत ईएमआय भरता आला नाही तर बँक घर जप्त करू शकते.
फक्त आधार कार्डवर मिळवा 5 लाखांचे SBI पर्सनल लोन, येथे ऑनलाइन अर्ज करा
घर खरेदीनंतर येणाऱ्या अडचणी
तुम्ही खासगी नोकरीत असाल तर कंपनी बदलल्यावर नवीन ऑफिस घरापासून खूप दूर असू शकते. परिणामी प्रवासाचा खर्च आणि वेळ वाढतो. भाड्याने राहणाऱ्यांना मात्र आवश्यकतेनुसार घर बदलण्याची मुभा असते, जे काही अंशी अधिक लवचिकता देतं.
नेमका कोणता निर्णय योग्य?
Home Loan Or Rent House हा निर्णय तुमच्या आर्थिक स्थैर्यावर आणि जॉबच्या सुरक्षिततेवर अवलंबून असतो.
• जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असाल आणि आपत्कालीन फंड तुमच्याकडे असेल तर घर खरेदी करणे योग्य.
• जर नोकरीत अनिश्चितता असेल किंवा पुरेसं सेव्हिंग्स नसेल, तर काही काळ भाड्याने राहणे जास्त शहाणपणाचं ठरू शकतं.